DIO BULDANA NEWS 20.10.2022

 



लोकाभिमूख प्रशासन राबविण्यावर भर देणार

-जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 20 : सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करून लोकाभिमूख प्रशासन राबविण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही नवनियुक्त जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी दिली. 

नवनियुक्त जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पदभार स्विकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश‍ गिते, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड आदी उपस्थित होते.

श्री. तुम्मोड म्हणाले, शासकीय योजना आणि सेवांचा लाभ देण्यासाठी शेवटच्या घटकातील नागरिक हा केंद्रबिंदू ठेऊन प्रशासकीय कामकाज करण्यात येईल. जिल्ह्याचा विकास हेच एकमेव उद्दिष्ट समोर ठेवले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

पदभार स्विकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी श्री. तुम्मोड यांचे स्वागत केले.

00000



पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या

18 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

बुलडाणा, दि. 20 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शुभारंभ गुरूवार, दि. २० ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आला. यात जिल्हाभरातील 18 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते. श्रीमती महाले यांनी कर्जमुक्ती योजनेतून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्हाभरातून सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्या आजच हे अनुदान जमा होणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे सांगितले.

कार्यक्रमात प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी प्रमाणीकरण झालेले लाभार्थी पद्मनाथ बाहेकर, संदीप बाहेकर, श्रीवास वानखेडे, रामदास वानखेडे, उषा टेकाळे यांचा प्रतिनिधीक स्वरूपात श्रीमती महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या