Sunday 23 October 2022

DIO BULDANA NEWS 23.10.2022

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी ऑनलाईन अर्ज करावे

*जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2022-23 या वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

गतिमानता अभियान दि. 20 ऑगस्टपासन राज्यात सर्वस्तरावर राबविण्यात येत आहे. सदर अभियानासाठी दि. 16 ऑक्टोबर 2022 पासन ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात ये आहेत. या योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेसाठी pragatiabhiyan.maharashatra.gov.in पोर्टल विकसित करण्यात आले आहे. स्पर्धेकरिता सर्व स्तरावर अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 16 ते 31 ऑक्टोबर 2022 आहे. दि. 3 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार परिशिष्ट मध्ये दिलेल्या निर्देशानुसार विहित कालावधीत ऑनलाईन द्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

खो-खो खेळ प्रकारात 12 वजी 15 खेळाडूंचा समावेश

बुलडाणा, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार खो-खो या खेळ प्रकारामध्ये सन 2022-23 या वर्षात संघाची खेळाडू संख्या 12 वरुन 15 इतकी करण्यात आलेली आहे. 

जिल्हा अधिकारी कार्यालयजिल्हा क्रीडा परिषद तसेच एकविध खेळांच्या विविध संघटनांद्वारे तालुकाजिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हास्तर स्पर्धेचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे.

खो-खो या खेळातील खेळाडूंच्या संख्या वाढीबाबतची नोंद संबंधित शाळाखेळाची संघटना यांनी नोंद घेऊन प्रवेश अर्ज कार्यालयात नोंदवित असताना प्रवेश अर्जामध्ये 15 खेळाडूंचा समावेश करावा.  तसेच याची नोंद ऑनलाईन प्रवेश अर्जामध्ये नव्याने घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment