Friday 18 February 2022

DIO BULDANA NEWS 18.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 482 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 26 पॉझिटिव्ह

  • 61 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 508 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 482 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 25 व रॅपिड चाचण्यांमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 161 तर रॅपिड टेस्टमधील 321 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 482 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  शेगावं शहर : 1, बुलडाणा शहर : 2, चिखली शहर : 12, चिखली तालुका : अमडापूर 2, कोलारा 1, बेराळा 1, वळती 1, सांगवी 1, चांधई 1,  मेहकर तालुका : लव्हाळा 1, कळमेश्वर 1, खामगां तालुका : बोर जवळा 1, खामगांव शहर : 1,   अशाप्रकारे जिल्ह्यात 26 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 61 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान बुलडाणा येथील 54 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 796459 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97835 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97835 आहे.  आज रोजी 1105 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 796459 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98819 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97835 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 297 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 687 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******


नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ द्या

- खासदार प्रतापराव जाधव

*दिशा समिती बैठक

*चिखली-धाड रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करा

*भिंगारा गावाच्या रस्त्यासाठी वन विभागाने आपल्या अधिकार क्षेत्रात परवानगी द्यावी

*जनधन योजनेच्या खातेधारकांना विम्याचा लाभ द्यावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शेतकरी दरवर्षी खरीप हंगाम, रब्बी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. शेतकरी आपल्या पीक कर्जाचे 30 जुनच्या आत नियमित परतफेडही करतो. अशा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या 4 टक्के व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना केंद्रीय ग्रामीण विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष मनीषा पवार, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. इंगळे  उपस्थित होते. तसेच सभागृहात जि.प सभापती राजेंद्र पळसकर, सि.राजा नगराध्यक्ष सतिष तायडे, मोताळा नगराध्यक्ष माधुरी देशमुख आदींसह विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

    जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे दर्जेदार करण्याच्या सुचना करीत खासदार म्हणाले, रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड चालणार नाही. रस्ता काम करताना कंत्राटदाराने सुरक्षा नियम पाळावेत. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना जनतेच्या तक्रारींचे निरसन करावे. रस्ता कामामुळे शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना कंत्राटदराने नुकसान भरपाई द्यावी. काम पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटदराला देयकाची अदायगी करावी. चिखली – धाड रस्त्याचे काम बऱ्याच वर्षापासून खोळंबले आहे. या रस्त्यावर अपघात होत असून गतीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे. रस्त्यासाठी देण्यात आलेल्या उत्खननाच्या परवानग्या तपासण्यात याव्या. दोषींवर दंडात्मक कारवाई करावी.  खामगांव- चिखली रस्त्यावरील पेठ जवळील पूलाचे काम मार्गी लावावे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी.

    अतिदुर्गम भिंगारा गावाच्या रस्ता कामासाठी वन विभागाने परवानगी देण्याच्या सूचना देत खासदार श्री. जाधव म्हणाले, भिंगारा गावाच्या रस्त्यासाठी एक हेक्टर पर्यंत जमिनीचा प्रस्ताव तयार करावा. वन विभागाने या रस्त्यासाठी आपल्या अधिकार क्षेत्रात येणारी परवानगी तातडीने द्यावी. हा रस्ता पाच मीटर रूंदीचा करण्यात यावा. जिल्ह्यात मनरेगा योजनेतून कामांची संख्या वाढवावी. त्यासाठी 60 : 40 चा रेशो जिल्हा, तालुका स्तरावर ठेवावा. अकुशल कामाची संख्या वाढवून यामधून ग्रामपंचायत भवन, शाळा खोल्या, तलाठी कार्यालय, अंगणवाडी बांधकाम सारखी कामे करावी. यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची मर्यादा नाही. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगाची कामे वाढवावी. मजूरांच्या मस्टरची ऑनलाईन नोंदणी आठवड्याच्या आतच करावी. मस्टर नोंदणीसाठी लॉगीन आयडी रोजगार सेवकाकडे द्यावे. जेणेकरून मस्टर नोंदणी वेगाने होईल. भारतनेट प्रकल्पातंर्गत ग्रामपंचायत पर्यंत इंटरनेट जोडणी असल्याबाबत खात्री करावी. ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट जोडणी देवून नागरीकांना सुविधा देण्यात याव्यात.

  ते पुढे म्हणाले, जिगांव प्रकल्पातंर्गत पुनर्वसन होत असलेल्या गावांमध्ये घरांचा मोबदला द्यावा. घरांचा मोबदला तातडीने दिल्यास नागरिक नवीन पुनर्वसित गावात राहायला जातील. पुनर्वसनाची कामे गतीने पुर्ण करावी. जल जीवन मिशन अंतर्गत प्रगती पथावरील कामे कालमर्यादेत पूर्ण करावी. तसेच नवीन कामांचेही नियोजन करावे. पुढील खरीप हंगामाचे पीक कर्ज वाटपास विलंब न करता एप्रिल महिन्यापासूनच पीक कर्जाचे वाटप सुरू करावे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल. जिल्ह्यातील जन धन खातेधारक नागरिकांना 2 लक्ष रूपयांचा अपघाती विमा मिळतो. मात्र याबाबत जनजागृती नाही. तरी बॅकांनी जनधन खातेधारकाला खातेधारकाचा मृत्यू झाल्यास मिळत असलेल्या 2 लक्ष रूपये विम्याचा लाभ द्यावा. गावांमध्ये कृषि सहायकांनी गावातील एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्याकडील जन धन खात्याची माहिती घेवून संबंधित बँकेकडे विम्याच्या प्रदानासाठी प्रयत्न करावे.  तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रपत्र ड ची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये बरीच गरजू लाभार्थ्यांची नावे वगळली आहे. तरी याबाबत पुर्नसर्वे करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.  

    बैठकीला प्रकल्प संचालक श्री. इंगळे यांनी माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                                ******************

शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

  • जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता ; 5230 रूपये प्रति क्विंटल हमी भाव

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : जिल्ह्यात चालू हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5230 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 फेब्रुवारी 2022 पासून शासकीय हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

     हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी केंद्र सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 9 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 16 फेब्रुवारी 2022 रोजी पासून नोंदणी सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 ऑनलाईन पिक पेरासह, बँक पासबुकाची आधार लिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                    *****

जिल्ह्यात ज्वारी व मका खरेदीला मुदतवाढ

· 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार खरेदी

बुलडाणा,(जिमाका) दि.18 : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने मका व ज्वारी खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू होती. मात्र या खरेदीस मुदतवाढ देण्यात आली असून आता 28 फेब्रुवारी पर्यंत खरेदी सुरु राहणार आहे.शेतकऱ्यांची नोंदणी यापूर्वी झालेली आहे. मात्र त्यांची खरेदी करण्यात आलेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या मका व ज्वारी शेतमालाची खरेदी होणार आहे. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची नवीन नोंदणी होणार नाही.

   तसेच जिल्ह्यामध्ये मका व ज्वारी खरेदीसाठी 16 केंद्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये तालुका शेतकी सह. खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, मलकापूर, दे. राजा, जळगाव जामोद व खामगाव यांचा समावेश आहे. तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल अँग्रो प्रोड्युसर कंपनी, सुलतानपुर केंद्र- साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र- वाडी व पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी मोताळा / मलकापूर या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

     संबंधित संस्थांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या 7/12 वरील पूर्ण क्षेत्रावर खरेदी न करता पिक पेरानुसारच खरेदी करण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment