Wednesday 9 February 2022

DIO BULDANA NEWS 9.2.2022

 अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमीक शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

      बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :   प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, वाशिम व जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्याकरीता लाभ घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडुन प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मिळतील.

            तरी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.  इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा.

   या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाखच्या आत असणे आवश्यक आहे. इयत्ता 1 ली प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या विदयार्थ्यांचे पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या व दारिद्र रेषेखालील कुटूंबातील अनुसूचीत जमातीच्या विदयार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.

  विदयार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात

येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल. वर्ग 2 साठी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र. आधार कार्डची झेरॉक्स प्रत विदयार्थांची जोडावी. अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                            *****

प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत मत्स्यशेती विषयावर 15 फेब्रुवारी रोजी वेबिनारचे आयोजन

      बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :   मत्स्यव्यवसायमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, अमरावती मार्फत प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत मत्स्यशेती या विषयावर एक दिवशीय वेबिनारचे आयोजन 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. तरी या एक दिवसीय वेबिनार कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकारांनी उपस्थित रहावे. या वेबिनारच्या लिंकसाठी सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. देवकत्ते यांच्या 8856929431 या मोबाईल क्रमांकावर व सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, कोराडी श्री. साळुंके यांच्या 8669072768 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

                                                            *****

कोरोना अलर्ट : प्राप्त 890 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 223 पॉझिटिव्ह

  • 777 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1113 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 890 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 223 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 204 व रॅपिड चाचणीमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 435 तर रॅपिड टेस्टमधील 455 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 890 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका :  माळवंडी 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : एकलारा 6, पेठ 1, शेलगांव 1, बोरगांव काकडे 1, टाकरखेड 1,   दे. राजा शहर : 2,  लोणार शहर : 1, सिं. राजा तालुका : सवडत 1, नांदुरा शहर : 54, नांदुरा तालुका : महाळुंगी 1, वडी 4, चांदुर 2, कोकलवाडी 1, वडनेर 1, बेलुरा 2, जयपूर 2, तरवाडी 1, शे. मुकूंद 1, पातोंडा 2, पलसोडा 3, फुली 1, निमगांव 3, अंबोडा 2, हिंगणा भोटा 1, खडदगांव 1, खैरा 1, टाकळी वतपाळ 1, इसापूर 2, रोटी 1, बेलाड 1, मामुलवाडी 1, शेंबा 1,   खामगांव शहर : 7, खामगांव तालुका : पिं. राजा 11, आमसरी 2, पोरज 4, बोरजवळा 3, पारखेड 4, भालेगांव 3, जळका भडंग 3, भंडारी 1, गारखेड 1, कुंबेफळ 1, निपाणा 1,राहुड 1, घानेगांव 1, टाकळी तलाव 2,  शेगांव शहर : 2, संग्रामपूर शहर : 20, संग्रामपूर तालुका : पळशी 12, एकलारा 1,  जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 5, पळशी सुपो 1, मोहिदेपूर 1, मोताळा तालुका : तपोवन 1, पुन्हई 1, तरोडा 1, घुस्सर 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 1, परजिल्हा : तेल्हारा 1,   अशाप्रकारे जिल्ह्यात 223 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 777 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उपचारादरम्यान बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 791738 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 96156 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 96156 आहे.  आज रोजी 2429 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 799738 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98150 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 96156 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 1310 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 684 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

 

--

No comments:

Post a Comment