Tuesday 8 February 2022

DIO BULDANA NEWS 8.2.2022

 


विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश देण्यास सुरूवात

  • 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

      बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :   महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजननिवासअद्यावत क्रीडा सुविधाक्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना पुरविण्यात येतात.   सन 2022-23 या वर्षी राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये 19 वर्षाखालील खेळाडूंची निवड करणे प्रस्तावीत असुन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. 

   राज्यातील अमरावतीनागपूरअकोलागडचिरोलीठाणेनाशिककोल्हापूरऔरंगाबाद व पुणे या ठिकाणी शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वीत आहेत.  सदर ठिकाणी नविन प्रशिक्षणार्थींची निवड करणे प्रस्तावित आहे.     क्रीडा प्रबोधिनीमध्ये आर्चरीज्युदोहॅण्डबॉलअॅथलेटिक्सबॉक्सिंगबॅडमिंटनशुटिंगकुस्तीहॉकीटेबल टेनिसवेटलिफ्टींगजिम्नॅस्टीक्सजलतरण व फुटबॉल आदी खेळांचा समावेश आहे.     सरळ प्रवेश प्रक्रीयेद्वारा आर्चरीज्युदोहॅण्डबॉलअॅथलेटिक्सबॉक्सिंगबॅडमिंटनशुटिंगकुस्तीहॉकीटेबल टेनिसवेटलिफ्टींगजिम्नॅस्टीक्स या खेळ प्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धांमधील पदकविजेते तसेच राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूंची तज्ज्ञ समितीद्वारा चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे. खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे   आर्चरीज्युदोहॅण्डबॉलअॅथलेटिक्सबॉक्सिंगबॅडमिंटनशुटिंगकुस्तीहॉकीटेबल टेनिसवेटलिफ्टींगजिम्नॅस्टीक्स या खेळप्रकारांच्या कीमान राज्यस्तरीय स्पर्धांमधील सहभागी खेळाडूंची तज्ञ समितीद्वारा चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे.  शिवछत्रपती क्रीडापीठपुणे अंतर्गत निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण केंद्रे ही कार्यान्वीत आहेत.  याद्वारे खेळाडूंना क्रीडा साहित्य, प्रशिक्षण, गणवेष, राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा प्रवास तसेच पौष्टीक आहार या सुविधा पुरविल्या जातात.  याप्रकारच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरीता राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडूंची विविध कौशल्य चाचणीद्वारे निवड केली जाणार आहे.

    क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार हा 19 वर्षाखालील तसेच महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे अनिवार्य आहे.  क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार खेळाडूकडे सहभागी झालेल्या राज्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रेआधारकार्ड तसेच नगरपालिका  अथवा ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्र खेळाडूंनी राज्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रेआधारकार्ड तसेच नगरपालिका / ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा येथे दि. 15 फेब्रुवारी 2022 पुर्वी सादर करावे.  सदर अर्जात खेळाडूचा संपर्क क्रमांकपुर्ण पत्ताई-मेल आयडी नमुद करावा.

      विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन दि.21 ते 25 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत होणार आहे.  तरी जिल्ह्यातील पात्र संबंधीत खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथुन अर्ज प्राप्त करुन घेऊन, आवश्यक कागदपत्रे दि.15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.  विहीत नमुन्यातील अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्म दाखला, इत्यादी माहिती सादर करावी.  तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

                                                                        ***********

कोरोना अलर्ट : प्राप्त 648 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 138 पॉझिटिव्ह

  • 420 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 786 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 648 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 138 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 129 व रॅपिड चाचणीमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 435 तर रॅपिड टेस्टमधील 213 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 648 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका :  सव 1, केसापूर 3, जांब 1, पांगरी 1, देऊळघाट 1, धाड 1, मासरूळ 1, गुम्मी 1, शिरपूर 1, चिखली शहर : 3, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : पांगरी 1, लोणार तालुका : कुंबेफळ 1, भुमराळा 1, सिं. राजा तालुका : उगला 1, नांदुरा तालुका : पोटळी 1, मेहकर शहर : 5, खामगांव शहर : 1, शेगांव शहर : 50, शेगांव तालुका : मानेगांव 1, कवठा 1, संग्रामपूर तालुका : पिंगळी 2, सोनाळा 8, बोरखेड 1, जळगांव जामोद तालुका : सावरगांव 1, पळसखेड 1, बोराळा 1, उटी 1, मडाखेड 1,    अशाप्रकारे जिल्ह्यात 138 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 420 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 790848 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 95379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 95379 आहे.  आज रोजी 2798 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 790848 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 97927 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 95379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 1865 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 683 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

भुसावळ येथील 27 फेब्रुवारी रोजी आयोजित मेळावा रद्द

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 8: जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांच्यासाठी 27 फेब्रुवारी 2022 रोजी मिलिटरी स्टेशन, भुसावळ येथे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर मेळावा कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला असून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

********

                                                           

कंत्राटी पदांसाठी अर्ज आमंत्रित

              बुलडाणा,(जिमाका) दि.8 : सैनिकी मुलींचे वसतिगृह व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, गायरान एरिया, सागवन बुलडाणा येथे तात्काळ मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने रिक्त पदे भरावयाची आहेत. यामध्ये चौकिदार (फक्त माजी सैनिकांसाठी) 02 पदे आहेत.  तरी इच्छुक माजी सैनिकांनी 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलडाणा येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                                                                ********

 

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिंक छळापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत

अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज आमंत्रित

  • 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे

 बुलडाणा,(जिमाका) दि.8 : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिंक छळापासुन संरक्षण अधिनियम (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम 2013 अन्वये कलम 4(1) अंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिंक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कार्यालयाअंतर्गत तक्रार समिती व कलम 6(1) अंतर्गत जिल्हास्तरावर स्थनिक तक्रार समितीसुद्धा गठित करण्याची तरतुद आहे. सदर अधिनियमाअंतर्गत दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता जिल्हा अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे.

      जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करावयाची आहे. त्याअनुषंगाने स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करण्यासाठी नामांकने मागविण्यात येत आहे.

सदरील अध्यक्ष निवडीकरीता अर्जदार व्यक्ती किमान पदवीधर असावा, महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या कामाचा 5 वर्षाचा अनुभव असावा, अशासकीय अध्यक्षाचा कालावधी नेमणूकीपासून तीन वर्षाचा असणार आहे. सदरील दोन सदस्य निवडीकरीता महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकिय संघटना, संघ किंवा लैगिंक छळाच्या प्रश्नांची परिचित असलेली व्यक्ती यामधून दोन सदस्य नामानिर्देशित करावयाचे आहेत. त्यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. एक सदस्य हा कायद्याची पार्श्वभूमी असलेला असावा. किमान एक सदस्य हा अनुसुचित जाती, अुनसुचित जमाती किंवा इतर मागसवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.

    सदरील इच्छुक पात्र व्यक्तींनी आपले शैक्षणिक पात्रता, सदरील कामाविषयीचा अनुभव व संमतीपत्र सदरील समितीसाठी अध्यक्ष तथा सदस्य या पदावर नियुक्ती करणे बाबतचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँडच्या मागे, मुठ्ठे ले आऊट, डॉ जोशी नेत्रालय जवळ, बुलडाणा येथे 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती बुलडाणा यांनी केले आहे.

                                                                                                **********

 

कामगार कल्याण केंद्र मलकापूर तर्फे आरोग्य तपासणी शिबीर

 बुलडाणा,(जिमाका) दि.8 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, अकोला अंतर्गत कामगार कल्याण केंद्र मलकापूर तर्फे अमीत पेपर मिल, दाताळा येथील कामगार व त्यांच्या कुटूंबियांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर 31 जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी पेपर मीलचे व्यवस्थापक दिपक बऱ्हाटे, अशोक घनोकार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील, डॉ. अनुप धोरण, डॉ सौ मयुरी धोरण उपस्थित होते.

  शिबिराप्रसंगी कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमाबद्दल कु. सुनीता पाटील यांनी उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक केंद्र प्रमुख श्री. शिरसोले यांनी केले. ते म्हणाले, तळागाळातील कामगारांनी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. दरम्यान, अमीत पेपर मील, किरण पेपर मील, अक्षय पेपर प्रॉडक्ट मधील उपस्थित कामगारांची व त्यांच्या कुटूंबियांची मोफत आरोग्य तपासणी करून आरोग्य समस्येचे निराकारण करण्यात आले. तसेच कामगारांना मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले. संचलन कु. सुनीता पाटील यांनी, तर आभार श्री. शिरसोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती नलीनी देशमुख, पवन पाटील, विपूल धोरण, कु. माधुरी काकडे यांनी प्रयत्न केले, असे केंद्र संचालक यांनी कळविले आहे.

                                                            **********  


जिल्हा उद्योग मित्र व जिल्हा सल्लागार समितीची सभा उत्साहात

 बुलडाणा,(जिमाका) दि.8 : जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समिती व स्थानिक लोकांना रोजगार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिगंबर पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित हाते. तसेच सभागृहात उद्योजक, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

   प्रादेशिक व्यवस्थापक श्री. पारधी यावेळी म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञान दिवसागणिक येत आहे. त्यामुळे सदर तंत्रज्ञानस्नेही मनुष्यबळ असणे ही उद्योजकांची गरज आहे. तरी अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान उद्योगात आल्यास किंवा अवलंब केल्यास उद्योजकांनी मागणी केल्यास त्यांना आयटीआय कडून तशा पद्धतीचे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून मिळणार आहे. तरी उद्योजकांना मागणी करावी. तसेच यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थाकडून आकारले जाणारे कर एमआयडीसीला द्यावे लागणार आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये गटारी, नाल्या आदी सुविधा महामंडळ देणार आहे. मात्र मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावा लागणार आहे. चिखली एमआयडीसी जवळ जागा बघून विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी उद्योजकांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतीपादनही त्यांनी केले.

   महाव्यवस्थापक श्री. पाटील यावेळी म्हणाले, मलकापूर एमआयडीसीमध्ये  नाल्यांची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्याच्या निर्यात आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राची महत्वाची भूमिका असणार आहे. जिल्ह्यातील निर्यात वाढीसाठी यातून प्रयत्न केल्या जाणार आहे. निर्यातीसाठी जिल्ह्यात वाव असणाऱ्या बाबींचा विकास करण्यात येणार असून उद्योजकांच्या निर्यातीमधील अडचणी दूर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित उद्योजकांची आपल्या समस्या याप्रसंगी मांडल्या.

**********

No comments:

Post a Comment