Friday 11 February 2022

DIO BULDANA NEWS 11.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 840 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 140 पॉझिटिव्ह

  • 428 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 980 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 840 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 140 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 130 व रॅपिड चाचणीमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 440 तर रॅपिड टेस्टमधील 400 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 840 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : मुरादपूर 1, पेठ 1, मंगरूळ 1, अमोना 2, दे. घुबे 1, पिंपळवाडी 1, शेलगांव आटोळ 1, शेलूद 1, खैरव 1, करतवाडी 1, एकलारा 1,  चिखली शहर: 11, दे. राजा शहर : 2, सि. राजा शहर : 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : भिंगारा 1, सुनगांव 4,  खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : तांदुळवाडी 1, जळका तेली 1, नागापूर 1,  टेंभुर्णा 1,  नांदुरा तालुका : अंबोडा 1, वडाळी 1, लोणार शहर : 5, लोणार तालुका : हत्ता 1,नागझारी 2,  मनुबाई 1, परडा 1, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, वानखेड 1, सायखेड 1, चांगेफळ 1, सोनाळा 3, लाडनापूर 2,  संग्रामपूर शहर : 6, सिं.राजा तालुका : वडगांव 1, मोताळा तालुका : उऱ्हा 1, शेलापूर 5, घुस्सर 1, दाभाडी 3, पिंप्री गवळी 1, तळणी 4, दहीगांव 2, सारोळा मारोती 1,  बुलडाणा शहर : 14, बुलडाणा तालुका : वरवंड 1,   मलकापूर शहर : 2, मेहकर शहर : 5, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : येऊलखेड 1, भोनगांव 24  परजिल्हा : जाफ्राबाद 1,भोकरदन 1, अकोला 1,  अशाप्रकारे जिल्ह्यात 194 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 428 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 793410 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97006 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97006 आहे.  आज रोजी 1722 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 793410 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98484 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97006 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 794 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 684 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******


अनाथ बालकांना बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून लाभ देण्यात यावा

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • अनाथ बालकासंदर्भातील जिल्हा कृती दलाची बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : जिल्ह्यात कोविडमुळे एक पालक किंवा आई-वडील गमावलेल्या बालकांची संख्या 522 असून चारशेपेक्षा जास्त बालकांची गृहचौकशी पूर्ण करण्यात आली आहे. बाल कल्याण समितीमार्फत काळजी व संरक्षणातील बालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी, शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क आदींकरीता 10 हजार रूपयापर्यंत मदत बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात अनाथ बालकासंदर्भात जिल्हा कृती दल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते.  

  बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एम. एम अष्टेकर, बाल संरक्षण अधिकारी श्री. मराठे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी आदेशीत करताना म्हणाले, जिल्हा कृती दलाला 164 महिलांची माहिती प्राप्त झाली असून खामगांव, मेहकर व बुलडाणा तालुके वगळता इतर तालुक्यात सदर महिलांना योजनांचा लाभ देण्यात यावा. मिशन वात्सल्य, शासन आपल्या दारी अंतर्गत एकल अथवा विधवांना शासन निर्णयाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यासंदर्भात तालुका स्तरावर कार्यवाही करण्यात यावी.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत बालकांच्या संपत्ती विषयक हक्कांचे संरक्षण करून त्यांना वारसा हक्क प्रमाणपत्र वाटप करावे.

  रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षणाबाबत सूचीत करीत जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यावर संकटात सापडलेल्या बालकांचे सर्वेक्षण पूर्ण करावे. सर्वेक्षणात ज्या बालकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखला नाही अशा बालकांना संबंधित कागदपत्रे काढून देऊन त्यांना सेवा देण्यात यावी. तसेच अशा बालकांचा सर्व ठिकाणी शोध घेवून त्यांची निश्चिती करून एक पालक, अनाथ, हरविलेले बालक व बेवारस बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करावे.


जयदीपला दिली कौतुकाची थाप

जयदीप हा चिखली तालुक्यातील आहे. तो कोरोनामुळे आई-वडील गेल्यामुळे अनाथ झालेला होता. जिल्हा कृती दलामार्फत जयदीपला यापूर्वी 5 लक्ष मुदतठेव देण्यात आलेली आहे. तसेच अनाथ प्रवर्गात एक टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळेच नीट परीक्षा 2021 मध्ये जयदीपला अनाथ प्रवर्गातून वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएसला संधी मिळाली. जिल्ह्यात अनाथ प्रवर्गातून  आरक्षणाचा लाभ घेणारा जयदीप हा पहिला विद्यार्थी असून या कामगिरीबद्दल जयदीपचा सत्कार करीत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी त्याला कौतुकाची थाप दिली आहे.  

                                                                        ******

बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदाची कामे मिळणार

• 18 फेब्रुवारी  2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर येथे कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयाची आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था सफाईगार पदासाठी काम करण्यास इच्छूक असल्यास प्राथमिक छाननी करीता प्रस्ताव 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे सादर करावा.

   सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments:

Post a Comment