Wednesday 16 February 2022

DIO BULDANA NEWS 16.2.2022

कोरोना अलर्ट : प्राप्त 516 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 27 पॉझिटिव्ह

  • 101 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 543 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 516 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 27 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 22 व रॅपिड चाचण्यांमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 173 तर रॅपिड टेस्टमधील 343 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 516 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव तालुका : चितोडा 1, पळशी 2, बोथाकाजी 1, लोणार 1, कंचनपूर 1, नागापूर 1, हिंगणा 1, बोरी 1, बोथा 1,दस्तापूर 2, हिवरा 1, शहापूर 1,  खामगांव शहर : 7, शेगांव शहर : 4, शेगांव तालुका : जवळा बु 1, बुलडाणा शहर : सोळंके ले आऊटब 1,  अशाप्रकारे जिल्ह्यात 27 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 101 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 795570 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97582 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97582 आहे.  आज रोजी 1284 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 795570 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98770 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97582 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 502 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 686 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

राज्य शासनाची उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा प्रवेशिक सादर करण्यास मुदतवाढ

·         28 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

       बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2022 असा आहे.

         विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने राज्य व विभागीय पताळीवरील प्रवेशिका नागपूर येथील संचालक (माहिती), अमरावती येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीयपातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल       

             प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

            प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी इच्छूक पत्रकारांनी 28 फेब्रुवारी पर्यंत स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                                    *******


जिल्हाधिकारी कार्यालयात

संत रविदास महाराज यांना अभिवादन

 बुलडाणा,(जिमाका) दि. 16 :   संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

                                                                        ************

 


मूल्यवर्धन आणि व्यवसाय निर्मिती विषयावर व्यवसाय निर्मितीचे प्रात्याक्षिक

 बुलडाणा,(जिमाका) दि. 16 :   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागाद्वारे कृषिमाल प्रक्रिया, मूल्यावर्धन आणि व्यवसाय निर्मिती या विषया अंतर्गत 15 फेब्रुवारी रोजी भाजीपाला प्रक्रिया, मूल्यावर्धन आणि व्यवसायनिर्मिती या विषयावर व्यवसाय निर्मितीचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले .

      गृहविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्रा. स्नेहलता भागवत यांनी भाजीपाल्याचे आहारातील महत्व व त्यात असणा-या पोषणतत्वाबद्दलची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना दिली. त्यानंतर आपल्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात पिकणाऱ्या विविध प्रकारच्या भाजीपाल्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करावी व त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. सदर प्रात्यक्षीकामध्ये मेथी, पालक, कोथिबीर सारख्या पालेभाज्या, बटाटा, गाजर, पानकोबी, फुलकोबी, वांगे, टोमॅटो, भेंडी, कांदा, लसून, हिरवा वाटाणा, भाजीपाला सुकविणे व टोमाटो केचप, टोमॅटो लोणचे तसेच टोमॅटोचे विविध मूल्यवर्धित पदार्थ

निर्मिती, विविध भाजींचे लोणचे बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

   त्याशिवाय बाजरी पीठाची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी करावयाची उष्णतेच्या विविध प्रक्रिया प्रात्यक्षीकाद्वारे करून दाखविल्या. दुपारच्या सत्रात कृषि अभियांत्रिकी विभागाचे विषय विशेषज्ञ राहुल चव्हाण यांनी मिनी डाळ मिल या कृषीवर आधारित व्यवसायाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच हळद व अद्रक प्रक्रीयेची माहिती देऊन कृषिमाल प्रक्रियाकडे वळण्याचा ग्रामीण युवक, शेतकरी व बचत गटातील महिलांना आवाहन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बुलडाणा चिखली, संग्रामपूर, खामगाव, मेहकर तालुक्यातील ग्रामीण युवक व उमेद अंतर्गत महिला बचत गटातील महिलांनी 30 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. 

No comments:

Post a Comment