Tuesday 22 February 2022

DIO BULDANA NEWS 22.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 405 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 09 पॉझिटिव्ह

  • 9 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 405 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 9 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 09 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 25 तर रॅपिड टेस्टमधील 380 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 405 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : चांडक ले आऊट 1, खामगांव तालुका : मादनी 1, अटाळी 1, खामगांव शहर : 2,   अशाप्रकारे जिल्ह्यात 09 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 09 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 797698 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98056 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98056 आहे.  आज रोजी 901 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 797698 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98881 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98056 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 137 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

श्री. संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सोहळा साध्या पद्धतीने

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : सध्याची परिस्थिती पाहता अद्यापपावेतो कोविड 19 या आजाराचा नवीन व्हेरीएंट ओमिक्रॉन या आजाराचा धोका टळलेला नसून सदरचा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध घातलेले आहे. त्याबाबत आदेशदेखील पारित केले आहे. त्यानुसार कुठल्याही प्रकारच्या रॅली, मिरवणूका, मोटार रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे नमूद आहे. श्री संत गजानन महाराज यांचा 144 वा प्रगटदिन उत्सव सोहळा 23 फेब्रुवारी 2022 रोजी कुठल्याही प्रकारची मिरवणूक न काढता मंदीराचे आतील परिसरातच नियमानुसार साजरा करण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. या सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तींची थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

                                                                        ******

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदतवाढ, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत

* अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास प्राचार्य जबाबदार राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.

    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https:// mahadht.mahit.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 14 फेब्रुवारी पासुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्याची महाडिवीटो पोर्टल वरील 18 फेब्रुवारी पर्यंतची स्थिती पाहता जिल्हा अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यासाठी महाविद्यालयांच्या वारंवार ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील ऑनलाईन बैठक घेवून महाविद्यालयांचे प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या.  मात्र तरीही महाविद्यालयांचे प्राचार्य शिष्यवृत्ती अर्जाची नोंदणी करण्यास उदासिन आहे.  

  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची केवळ 71 टक्के नोंदणी झालेली आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मागील वर्षाच्या तुलनेत नोंदणी 100 टक्के करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाविदयालयातील मागासवर्गीय विदयार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. तरी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्म भरण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

या महाविद्यालयांची नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी

कादरीया कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलडाणा, व्यवसाय प्रशासन महाविद्यालय आरास ले आऊट बुलडाणा, अभिनव महाविद्यालय बुलडाणा, वसंतप्रभा कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा, रामभाऊजी लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज बुलडाणा, यशवंत अध्यापक विद्यालय बुलडाणा, डॉ. राजेंद्र गोडे अध्यापक विद्यालय बुलडाणा, राजर्षी शाहू महाराज अध्यापक विद्यालय माळविहीर, प्रगती अध्यापक विद्यालय येळगांव, महाराणा प्रताप ज्यु. कॉलेज धाड, विवेकानंद विद्यालय सव, लेट नारायणराव जानराव देशमुख सिनीअर कॉलेज अमडापूर, श्री शिवाजी सायन्स अँड आर्ट कॉलेज चिखली, श्री. शिवशंकर विद्यालय भरोसा ता. चिखली, श्री. ज्ञानेश्वर विद्यालय पेठ ता. चिखली, श्री. व्यंकटेश आर्ट अँड कॉमर्स कॉलेज दे. राजा, दे. राजा ज्युनिअर कॉलेज दे. राजा, व्यंकटेश सिनीअर कॉलेज दे.राजा, श्रीपाद कृष्णा कोल्हटकर महाविद्यालय जळगांव जामोद, शासकीय आटीआय जळगांव जामोद, सेठ तुळशीरामजी ढोकणे ज्यु. कॉलेज जळगांव जामोद, श्रीमती सुरजादेवी रामचंद मोहता महिला महाविद्यालय खामगांव, ए. के नॅशनल ज्यु. कॉलेज खामगांव, जि.प मराठी उप प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय खामगांव, लेट कृष्णराव रामजी पाटील विद्यालय अँड ज्यु. कॉलेज बोरी अडगांव ता. खामगांव, डॉ. आर एन लाहोटी महिला सायन्स महाविद्यालय लोणार, शासकीय आटीआय लोणार, डॉ. के. बी मापारी इन्स्टीट्युट ऑफ नर्सिंग लोणार, महाराणा प्रताप हायस्कूल लोणार, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार, डी. ई. एस ज्युनिअर कॉलेज दाताळा ता. मलकापूर, नगरपालिका उप प्राथमिक, माध्यमिक अँड उच्च माध्यमिक मलकापूर, लिलाधर भोजराज चांडक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर, भिवसन पाटील शिंदे शिक्षण ग्रामीण विकास आणि बहु संस्था, शिंदे पॉलीटेक्नीक अंजनी बु ता. मेहकर, एमईएस कॉलेज ऑफ फार्मसी मेहकर, श्री. संत गजानन बाबा महाविद्यालय मोताळा, एमईएस हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज धा. बढे ता. मोताळा, कोठारी अध्‍यापक विद्यालय नांदुरा, वासंतीदेवीकाबरा ज्यु. कॉलेज नांदुरा, जिजामाता महिला कॉलेज ऑफ एज्युकेशन सिं. राजा, उत्कर्ष आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सिं.राजा, लेट विजय मखामळे इन्स्टीट्युट ऑफ आरजीएनएम स्कूल, रामेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन सिं.राजा, नुतन मिडल विद्यालय सिं.राजा, जिजामाता सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल सिं.राजा, हॉनेबल विलासराव देशमुख डि. एड कॉलेज निवाणा ता. संग्रामपूर, जि.प मराठी उप प्राथमिक, माध्यमिक अँड उच्च्‍ माध्यमिक पातुर्डा ता. संग्रामपूर,श्री संत गुलाबबाबा विद्यालय अँड ज्यु. कॉलेज संग्रामपूर, बी.डी विद्यालय कवठळ ता. संग्रामपूर, बी.डी विद्यालय निवाणा ता. संग्रामपूर,  लेट उत्तमराव देशमुख अध्यापक विद्यालय शेगांव, शरद पवार अध्यापक विद्यालय शेगांव, पुर्णा आर्ट कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेज शेगांव, सातपुडा मिडल विद्यालय शेगांव, दिपस्तंभ महाविद्यालय शेगांव.

                                                                                    *****

तीन गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि.22: बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड, वरवंड व चिखली तालुक्यातील असोला बु गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 असून टँकरद्वारे गावाला दररोज 14 हजार लीटर्स, वरवंड गावच्या 3789 लोकसंख्येला 76 हजार 960 लीटर्स व असोला बु येथील 1350 लोकसंख्येकरीता 37 हजार 500 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. 


--

No comments:

Post a Comment