Thursday 10 February 2022

DIO BULDANA NEWS 10.2.2022

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 832 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 194 पॉझिटिव्ह

  • 422 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1026 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 832 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 194 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 177 व रॅपिड चाचणीमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 427 तर रॅपिड टेस्टमधील 405 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 832 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : सि.राजा तालुका : साखरखेर्डा 2, सिं. राजा शहर : 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : काजेगांव 2, बोराळा 1, इलोरा 1, वडशिंगी 1, मडाखेड बु 6, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : शेंदला बु 1,  लोणार तालुका : पिंपळनेर 1, बिबी 2, चोरपांग्रा 1, लोणार शहर : 1, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : खैरा 1, चिखली शहर : 39, चिखली तालुका : मेरा बु 2, गांगलगांव 1,  बुलडाणा शहर : 9, बुलडाणा तालुका : पांगरी 1, येळगांव 1, माळवंडी 1,  खामगांव तालुका : कौंटी 2, दाभाडी 2, कंझारा 7, वर्णा 6, काळेगांव 1, शिजगांव 1,  मांडणी 3, निमकवळा 3, मांडका 6, नांद्री 1, रोहणा 5,  ढोरपगाव 4, हिवरा बु 1, पोरज 1, लाखनवाडा 1, श्रीधर नगर 1, पेसोडा 1, खामगांव शहर : 16, मलकापूर शहर : 3, शेगांव शहर : 16, शेगांव तालुका : कुरखेडा 1, भालेगांव 1, चिंचोली 1, गायगांव 2, गौलखेड 1, पहुरपूर्णा 1, खेर्डा 1, माटरगांव 1,   संग्रामपूर तालुका : बावनबीर 1, पातुर्डा 2, उकळी 1, वानखेड 10,सावळी 1, कोलद 1, परजिल्हा : बाळापूर 1, अकोट 1,  तेल्हारा 4,   अशाप्रकारे जिल्ह्यात 194 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 422 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 792570 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 96578 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 96578 आहे.  आज रोजी 2088 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 792570 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98344 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 96578 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 1082 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 684 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

अल्पसंख्यांक खाजगी व अपंग शाळांमध्ये मिळणार पायाभूत सुविधा

· 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत

· प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत इच्छुक शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शाळांनी 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णयामधील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावी.  या योजनेतंर्गत वार्षिक कमाल 2 लक्ष रूपये अनुदान उपलब्ध होणार आहे. अर्जाचा नमुना व आवश्यक कागपत्रांची यादी  https://mdd.maharashtra .gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 योजनेच्या लाभासाठी शासमान्य खाजगी शाळा कनिष्ठ महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था व न.प. शाळांमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यता प्राप्त अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

   इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. 18 फेब्रुवारी, 2022 पर्यंत सादर करावे. तरी अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता इच्छूकांनी तात्काळ अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

                                                            या पायाभूत सुविधांसाठी मिळणार अनुदान

शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, प्रयोगशाळा उभारणे, अद्यायावत करणे, संगणक कक्ष उभारणे अथवा अद्ययावत करणे, प्रसाधनगृह अथवा स्वछतागृह उभारणे, किंवा डागडुजी करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, वर्ग खोल्यामध्ये आवश्यकतेनुसार  पंख्यांची व्यवस्था करणे, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्यापनाची साधने एल.सी.डी. प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इत्यादी, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, संगणक हार्डवेअर/सॉफटवेअर आदी.  

                                                                                **********

स्मार्ट प्रकल्पातंर्गत शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावे

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज, ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज सादर करू नये

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत राज्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. स्मार्ट प्रकल्पामध्ये समुदाय आधरीत संस्था अर्ज करू शकतात. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी व त्यांचे  फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्थापीत प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापीत लोकसंचालीत साधन केंद्र यांचा समावेश आहे.

 जाहीराती संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहिती https://www.smart-mh.org  या संकेतस्थळावर कॉल फॉर प्रोपोजल या टॅबवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतसथळावरून डाऊनलोड करून प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात तसेच लोकसंचालीत साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांचे कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे. या अगोदर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे कृषि उपसंचालक वि.रा बेतीवार  यांनी कळविले आहे.

**********

जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना तयार करणे सुरू

  • कोणतीही प्रभाग रचना आयोगाकडून मान्य नाही
  • प्रभाग रचनेचे प्रसारीत नकाशे, माहिती चुकीची असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : सद्यस्थितीत जिप व पंचायत समिती निवडणूकीसाठीची प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र अद्याप कोणतीही प्रभाग रचना राज्य निवणूक आयोगाने मान्य केलेली नाही. असे असतानाही सोशल मिडीया तसेच ईतर माध्यमातुन बुलडाणा तालुक्याच्या प्रभाग रचनेच्या संबंधित विविध नकाशे प्रसारित होत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठीची प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम अंतिमरित्या मान्य झालेला नाही.

       प्रभाग रचना निवडणूक आयोगाने मान्य केल्या नंतर तहसिल कार्यालया मार्फत प्रसिध्द करण्यात येते. काही आक्षेप किंवा हरकत असल्यास त्या दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेळ देण्यात येतो. त्या संदर्भातील कायदेशीर कार्यवाही राज्य निवडणूक आयोगा मार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे अनाधिकृत रित्या प्रसारीत होणारे विविध नकाशे हे खाजगी व्यक्तींनी अंदाजीत आधारावर तयार केलेले असावेत. प्रभाग रचनेचा कोणताही नकाशा, माहिती तहसिल कार्यालयाने प्रसिध्द केलेली नाही. प्रसारीत होणारे विविध नकाशे , माहिती यांच्याशी निवडणूक विभागाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे या संदर्भात प्रसारीत होणारी माहीती ही चुकीची असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसिलदार रूपेश खंडारे यांनी केले आहे.

                              ******                         


चिखली तालुक्यात ड्रोन सर्वेबाबत बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : चिखली उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात चिखली तालुक्यात गावठाण ड्रोन सर्वेक्षण करण्याबाबत बैठकीचे आयोजन 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी तहसिलदार अजित येळे यांनी ड्रोन सर्वेबाबत ग्रामसेवक व तलाठी यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उप अधिक्षक भूमि अभिलेख विजय सवडतकर, गटविकास अधिकारी श्री. जाधव, विस्तार अधिकारी श्री. राठोड, तसेच नारायण वाघुर्डे, गोपाल चौधरी, निलेश फोलाणे आदी उपस्थित होते. बैठकीत ड्रोन सर्वे होत असलेल्या गावांमध्ये करावयाच्या व्यवस्थेबद्दल माहिती देण्यात आली. तसेच ग्रामसेवक व तलाठी यांच्या शंकाचे निरसनही करण्यात आले.

                                                            **********


पीसीपीएनडीटी कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : स्थानिक आय.एम.ए सभागृहात पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील सोनोग्राफी व एमटीपी केंद्र धारकांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या कार्यशाळेस प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चव्हाण, तहसिलदार रूपेश खंडारे, ॲड सोनाली सावजी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी, डॉ. वैशाली पडघान, शाहीना पठाण, डॉ कायंदे, डॉ. भागवत, डॉ. शिंदे, डॉ. वसू, ॲड वंदना काकडे आदी उपस्थित होते.

   कार्यशाळेत ॲड सावजी यांनी मुला मुलींमध्ये कशा प्रकारे समानता आणली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. चौधरी यांनी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी अगोदर नागरिकांमध्ये जनजागृतीद्वारे मतपरिवर्तन करून समानता पटवून देण्याचे आवाहन केले. डॉ. पडघान यांनी व शाहीना पठाण यांनी ही आपले मनोगतात मुलींचा जन्मदर वाढविण्यावर भर दिला. तसेच डॉ. कायंदे यांनी दोन मुली असणाऱ्या नागरिकांना काही विशेष योजना आखण्याची मागणी केली. यावेळी डॉ. भागवत, डॉ. वसू, डॉ. शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ॲड काकडे यांनी एमटीपी कायद्यातील सुधारणा व सोनोग्राफीचे रेकॉर्ड ठेवताना घ्यावयाच्या काळजीबाबत सांगितले. प्रास्ताविकात डॉ. चव्हाण यांनी सोनोग्राफी केंद्रधारकांनी कायद्याचे उल्लंघन होणार नसल्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तहसिलदार रूपेश खंडारे यांनी सोनोग्राफी व एमटीपी धारकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. भोंडे, श्री. जोशी, श्री. राऊत व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.  संचलन डॉ. साहेबराव सोळंकी यांनी केले.

******

No comments:

Post a Comment