Thursday 24 February 2022

DIO BULDANA NEWS 24.2.2022

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 441 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह

  • 21 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 07 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 06 व रॅपीड चाचण्यांमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 113 तर रॅपिड टेस्टमधील 328 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 441 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 3, सिं. राजा शहर : 1, परजिल्हा :  अशाप्रकारे जिल्ह्यात 07 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 21 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 798522 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98105 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98105 आहे.  आज रोजी 888 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 798522 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98891 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98105 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 98 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

पल्स पोलीओचा 27 फेब्रुवारी रोजी मिळणार डोस

· 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणार लस

· 2 लक्ष 58 हजार 289 अपेक्षीत बालके

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : देशातून पोलीओचे समुळ उच्चाटन झालेले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत पोलीओ देशात, राज्यात परत येवू नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच 27 फेब्रुवारी 2022 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीओ डोस पाजण्याची व्यवस्था, प्रत्येक गावांत, वॉर्डात, रेल्वे स्टेशन व बस स्थानके या ठिकाणी सुद्धा करण्यात आली आहे.

    पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील 2 लक्ष 58 हजार 289 अपेक्षीत बालकांना लस देण्यात येणार आहे. ही लाभार्थी संख्या आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1 लक्ष 94 हजार 888, तर शहरी भागातील 63 हजार 401 बालकांचा समावेश आहे. तरी सर्व पालकांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या नजीकच्या पोलीओ लसीकरण बुथवर बालकाला नेवून पोलीओचा डोस पाजावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                                                                ********



धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाईची मोहिम सुरू

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातंर्गत जिल्हा अंमलबजावणी पथकाने धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत धडक दंडात्मक कारवाईची मोहिम 24 फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. ही मोहिम जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या आदेशान्वये, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहरात राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत विविध ठिकाणी कारवाई करीत 4 हजार 400 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर कार्यवाहीसाठी जिल्हा अंमलबजावणी पथकामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंकी, श्री. वसावे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. गवारगुरू, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. भोसले, समुपदेशक श्री. सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्री. आराख यांचा समावेश होता.

                                                                        ************* 

--

No comments:

Post a Comment