DIO BULDANA NEWS 27.1.2022
कोरोना अलर्ट : प्राप्त 574 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 243 पॉझिटिव्ह 323 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 817 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 574 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 243 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 232 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 459 तर रॅपिड टेस्टमधील 115 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 574 अहवाल निगेटीव्ह आहेत. ...