Posts

Showing posts from February, 2025

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ; बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

Image
  केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ; बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव   बुलडाणा, (जिमाका) दि. 28: राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज येथे दिली.   ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मख्य कार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, आशिष पवार, विक्रांत जाधव, राज...

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट; विविध विषयाचा घेतला आढावा

  मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट; विविध विषयाचा घेतला आढावा   बुलडाणा, (जिमाका) दि. 28:   येथील मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे उपाध्यक्ष अ.जावेद व संचालक अहमद शरीफ देशमुख यांनी नुकतीच जिल्हा कार्यालयाला सदिच्छ भेट देवून महामंडळकडुन राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज योजनेचा आढावा घेतला. तसेच प्रलंबीत प्रस्ताव संदर्भात चर्चा करण्यात आली. गरजु लाभार्थ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे तसेच त्यांना कर्ज घेताना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रामाणीक भावना दाखवत कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर जिल्हा कार्यालयातील दैनंदीन समस्या या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापक ज्योती हिवाळे यांनी उपाध्यक्ष अ. जावेद यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. 0000000

अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

Image
  अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन   बुलडाणा, (जिमाका) दि. 28:   बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळघाट टोलनाका येथे अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृत इसमास ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.   प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी नामे डॉ शेख युनुस तर्फे कक्ष सेवक विनोद सतीष ढोरमारे (वय २९ वर्ष) रा. बुलडाणा यांचे रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन बुलडाणा (ग्रा) येथे मर्ग दाखल केले आहे.   त्यामध्ये एक अनोळखी मृतकाच्या अंगामध्ये राखाडी रंगाचे आडव्या लाइनचे कॉलरचे टि शर्ट, राखाड्या रंगाचे हाफ पँट, विटकरी रंगाचे निकर असून मृतकाची दाढी, मिशी तसेच डोक्यावरील केस वाढलेले, डाव्या पायावर गुडघ्याचे खाली जुन्या जखमाचा पांढरा छोटा व्रण, उंची अंदाजे ५.५ फुट उंची असलेला अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आलेला आहे. या वर्णनाचा इसम पोलीस स्टेशन हद्दीतून हरवीला किंवा कोणी या इसमास ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, बुलढाणा (ग्रा) येथे संपर्क साधावा.   तसेच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ०७२६२-२४१२५५ या द...

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा   बुलडाणा, (जिमाका) दि. 27: ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा वापर प्रत्येकाने संवादासाठी करणे गरजेचे असून मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची असल्याची भावना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी केले.   मराठी भाषा गौरव दिनानिमित्य 'घेऊ या एकच वसा, मराठीला बनवू ज्ञानभाषा' हा संदेश देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.   यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, अधीक्षक अजित जंगम तसेच अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.   स्टेट बँक ऑफ इंडियाचे मकरंद आपटे यांनी आर्थिक साक्षरता संदर्भात माहिती देऊन बँकेव्दारे चालवण्यात येणाऱ्या निवृत्त योजना, टर्म प्लॅन, मुलाच्या शिक्षणाकरिता असलेल्या योजना, गुंतवणूक योजना अशा विविध योजनाची माहिती दिली. तसेच बँकेचे व्यवहार ऑनलाईन झाले असून युनो ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाह...

3 मार्चला लोकशाही दिन

  3 मार्चला लोकशाही दिन   बुलडाणा, (जिमाका) दि. 27:   दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार मार्च महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.   लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी कळविले आहे. 0000000

दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सवात साजरी; शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक -केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Image
  दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सवात साजरी; शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक -केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव   बुलढाणा, दि. 24 (जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा   इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक असल्याच प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे केले.   आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारीला बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे होते. तर अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली असून आजच्या पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा आहे. छत्रपती शिवाजी म...

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

  जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन               बुलढाणा,दि. 24 (जिमाका):   फुटबॉल खेळाची शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी प्रथमच जिल्हास्तरीय युथ फुटबॉल लिग स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व फुटबॉल क्लबमधील 16 वर्ष वयोगटातील खेळाडूंनी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी केले आहे.     फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार समाजातील प्रत्येक खेळाडूंपर्यंत व्हावा यासाठी   जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युथ फुटबॉल लिग सन 2024-25 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हातील सर्व शाळेतील 16 वर्ष वयोगटातील खेळाडुंना   स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाणा   येथे ऑफलाईन विनामूल्य नोंदणी करून ...

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

  बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द   बुलढाणा,(जिमाका), दि.२४ : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे.   00000

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा

  डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा        बुलढाणा, दि. 24 (जिमाका): भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा या योजना नागरिकांना विमासुरक्षा देण्याकरिता चालविल्या जातात. विमा योजनांचे प्रीमिअम भरण्यासाठी विमाधारकांनी ऑनलाईन पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.   विमाधारकांनी विमा योजनांचे प्रीमिअम भरण्यासाठी pli.indiapost.gov.in या लिंकचा किंवा आयपीपीबी ॲपचा उपयोग करावा. याशिवाय एनएसीएच सुविधेचा उपयोग करुन विमाधारकांच्या बँक खात्यामधून आपोआप कपातीची सुविधा वापरावी. तसेच ज्या विमाधारकांच्या पॅालिसीला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी अद्ययावत नाही अशांनी इंडिया पोस्ट कॅाल सेंटरच्या 1800 266 6868 या क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक यांनी केले आहे. 000000

पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 10 मार्चपर्यंत अर्जाची मुदत

  पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 10 मार्चपर्यंत अर्जाची मुदत   बुलढाणा, दि. 24 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, अकोला कार्यालयाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेंतर्गत पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान किंवा अर्थसहाय्यासाठी पारधी, फासेपारधी समाजाच्या लाभार्थ्यांनी दि. 24 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   या योजनेचे छापील अर्ज विनामुल्य लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयास अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 10 मार्चपर्यंत असून या मुदतीपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. त्यानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.   योजना : पारधी समाजाच्या दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर शेळीपालन व्यवसायकरिता ५ शेळी १ बोकडे खरेदी करीता अर्थसहाय्य करणे, या योजनेंतर्गत डीबीटीव्दारे लाभ दिले जातील. २. पारधी समाजाच्या दारिद्र रेषेखालील लाभार्...

शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर

  शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर Ø   जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी Ø   शिवजयंती उत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा बुलढाणा, (जिमाका), दि.17 : यंदा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सव कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता आबाधित राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी बुधवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बीअर बार विक्री दुकाने बंद अर्थात कोरडा दिवस (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था व पूर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिजाउ सभागृहात घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महाम...

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम

  बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम Ø   आज उद्घाटन होणार बुलढाणा, (जिमाका), दि. 17 :   केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्डस मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या मदतीने देशातील सुमारे 100 शहरांमध्ये भूमि अभिलेख तयार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ‘नक्शा’ हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील 10 स्थानिक स्वराज्य संस्थापैकी बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात नगर भूमापनाकरिता ‘नक्शा’ हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मंगळवारी दि. 18 फेब्रुवारी रोजी प्रातिनिधीक स्वरूपात केंद्रीय ग्रामीण   विकास मंत्रालय व भूमि संसाधन मंत्री   शिवराजसिंह चव्हाण, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री   मोहन यादव   यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील जमिनीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प हा ग्रामविकास, भूमि अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त सहभागाने नगरपरिषद हद्दीत राबविण्याची मान्यता देण्यात आली आहे. य...

सिंदखेडराजा येथील शिबीर कार्यालय रद्द

  सिंदखेडराजा येथील शिबीर कार्यालय रद्द बुलढाणा,(जिमाका), दि.17 :   संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दि.20 फेब्रुवारी रोजी स्थानिक सुट्टी जाहीर झाली असल्यामुळे दि. 20 फेब्रुवारी रोजी होणारे सिंदखेडराजा येथील शिबीर कार्यालय दि. 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. वाहनधारक, वाहन वितरक, मोटार ड्रायव्हींग स्कुल संचालक तसेच नागरिकांनी दि. 28 फेब्रुवारी शिबीर कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकार यांनी केले आहे.   000000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कंत्राटी पध्दतीने भरती

  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कंत्राटी पध्दतीने भरती बुलढाणा,(जिमाका), दि.17 :   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलढाणा येथे माजी सैनिक, इतर प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मल्टी टास्कींग स्टाफ (अशासकीय) 1 पद मेस्को व्दारे भरावयाचे आहे. सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व इतर नागरीकांनी 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन‍   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे .   अर्जदाराने   वैयक्तिक अर्जासोबत आधार कार्ड, पॉन कार्ड, बॅक पासबुक, 10 वी पास प्रमाणपत्र   व संगणक प्रशिक्षण (MSCIT), टायपींग मराठी 30 व इंग्रजी 40 चे प्रमाणपत्र छायांकित प्रतीसह अर्जासोबत जोडावे. अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, संगणक प्रशिक्षण, टायपींग छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावे. 00000000

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

  बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द   बुलढाणा,(जिमाका), दि.17 :   जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे.   0000000

बुधवारी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा

  बुधवारी ‘जय शिवाजी, जय भारत ’ पदयात्रा               बुलढाणा,दि. 14 (जिमाका):   छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘जय शिवाजी, जय भारत ’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला शहरातील सर्व शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक, क्रीडा प्रेमी तसेच विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, प्रतिष्ठीत नागरिक, अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.   जिल्हा प्रशासन, नगरपरिषद, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु यवा केंद्र व एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयेाजन करण्यात आले आहे. या पदयात्रेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार असून उद्घाटनानंतर मान्यवराचे संबोधन होऊन पदयात्रेला प्रारंभ होईल. 000000

खामगांव शासकीय तंत्र निकेतन संस्थेतील निर्लेखित साहित्यांचा लिलाव

  खामगांव शासकीय तंत्र निकेतन संस्थेतील निर्लेखित साहित्यांचा लिलाव               बुलढाणा,दि. 14 (जिमाका):   खामगांव शासकीय तंत्र निकेतन खामगांव या संस्थेतील विविध विभागांमधील जडवस्तू संग्रहातील निरुपयोगी, कालबाह्य व निर्लेखित झालेले यंत्र, उपकरणे इत्यादी साहित्य लिलावा पद्धतीने विक्री करावयाची आहे. इच्छूक खरेदीदार, भंगार व्यावसायिक, कंत्राटदार यांचेकडून सीलबंद लिफाफ्यामध्ये निविदा मागविण्यात येत आहेत. लिलाव संदर्भातील सविस्तर माहिती www.gpk.edu.in या संकेतस्थळावर तसेच संस्थेच्या मुख्य सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक खरेदीदार यांनी दि. 1 मार्च 2025 पर्यंत निविदा सादर करावे, असे आवाहन शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे. 000000