भोगवटादार वर्ग एकमध्ये हस्तांतरण करण्यासाठी नझुल जमिन सुधारीत धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

भोगवटादार वर्ग एकमध्ये हस्तांतरण करण्यासाठी नझुल जमिन सुधारीत धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

        बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : शासनाने भोगवटादार वर्ग दोनच्या भोगवट्यावर किंवा पट्टेदारी हक्कांवर दिलेल्या रहिवासी, वणिज्यीक अथवा औद्योगिक व कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनींचे भोगवटादारी वर्ग-एक मध्ये रुपांतरीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज मागविण्यात आले आहे. जमिनींचे भोगवटादारी वर्ग-एक मध्ये रुपांतरीत करण्यासाठी नझुल जमिन सुधारित धोरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी(महसूल) समाधान गायकवाड यांनी केले आहे.

            तत्कालिन मध्य प्रांत आणि बेरार भागात लागू असलेल्या कायद्यानुसार लिलावाद्वारे किंवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझूल जमीनी दि. 2 मार्च 2019 अन्वये फ्री-होल्ड (भोगवटादारी वर्ग-1) मध्ये रुपांतरीत करण्याबाबत तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मार्च 2019 ते डिसेंबर, 2024 या कालावधीमध्ये एकूण 286 खतेदारांचे भुखंड फ्री-होल्ड (भोगवटादार वर्ग-1) मध्ये रुपांतरीत करण्यात आले असून 2 कोटी 89 लक्ष 38 हजार 272 रुपये रुपांतरण अधिमुल्याची वसूली करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 व सरकारी जमीनीची विल्हेवाट लावणे नियम, 1971 नुसार शासनाने भोगवटादार वर्ग दोनच्या भोगवट्यावर किंवा पट्टेदारी हक्कांवर दिलेल्या जमिनी वर्ग एकच्या भोगवट्यात रुपांतरण करणे संदर्भात दि. 8 मार्च 2019 रोजीच्या महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरित करण्यासाठी नियम, 2019 तयार करण्यात आले आहेत. त्यानूसार बुलढाणा जिल्ह्यातील मार्च, 2019 ते डिसेंबर, 2024 या कालावधीमध्ये एकूण 206 खातेदारांचे भुखंड, जमीनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यात आल्या आहेत व त्यापासून 3 कोटी 58 लक्ष 7 हजार 418 रुपये एवढे रुपांतरण अधिमुल्याची वसूली करण्यात आली आहे.

           तत्कालिन मध्य प्रांत व बेरार भागत लागू असलेल्या जमीन महसूल अधिनियमान्वये शासनाने निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी स्थाई भाडेपट्याने वाटप करण्यात आलेल्या भाडेपट्टयांच्या संदर्भात यापुर्वी शर्तभंग (अनधिकृत हस्तांतरण / वावपरात बदल) झालेला असल्यास किंवा नझूल जमिनीच्या हस्तांतरणास/वापरात बदलास पूर्वपरवानगी हवी आहे अशा भाडेपट्टाधारकांनी प्रस्तुत सुधारित धोरणानुसार असे शर्तभंग नियमित करणेसाठी, नझूल जमिनीच्या हस्तांतरणास किंवा वापरात बदलास पूर्वपरवानगीसाठी तसेच नझूल जमीनी फ्रीहोल्ड (भोगवटदार वर्ग-1) मध्ये रुपांतरीत करणेसाठी महराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 व सहकारी जमीनीची विल्हेवाट लावणे नियम, 1971 नुसार शासनाने भोगवटादार वर्ग - दोनच्या भोगवट्यावर किंवा पट्टेदारी हक्कांवर दिलेल्या रहिवासी किंवा वणिज्यीक अथवा औद्योगिक व कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनींचे भोगवटादारी वर्ग-एक मध्ये रुपांतरीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करून सुधारित धोरणाचा लाभ घेण्यात यावे. 000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या