शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी यांचे आवाहन
> •फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा मिळणार
लाभ
बुलढाणा,दि.28 (जिमाका) : शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक
योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निमिर्ती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात
फार्मर आयडी तयार करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत
असून शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन योजनेचा जास्तीत जास्त
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी
कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर
रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध
योजनांचा लाभ वितरीत करणे सुलभ होईल. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता
राहणार नाही. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा आहे. जेणेकरून
तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. फार्मर आयडी बनवला नाही तर पिक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पिक अनुदान यांचा लाभ मिळणार
नाही.
फार्मर आयडी बनवण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक जो आधार व बँक खात्याशी
लिंक व सातबारा किंवा नमुना 8 या कागदपत्राची
आवश्यक आहे. सदर कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या
नागरी सुविधा केंद्र नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय मुख्य
समन्वयक समाधान गायकवाड यांनी केले आहे.00000
Comments
Post a Comment