रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन
रस्ता
सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन
बुलडाणा, (जिमाका) दि. 31: राज्य शासनाच्यावतीने
दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा महिना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने
नेहरु युवा केंद्रामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत दि. 17 ते 23 जानेवारी
दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले असून रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ.
किरण पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी
डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम
पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनाचे
जिल्हा समन्वयक डॉ. हनुमंत भोसले, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी व रासेयो
कार्यक्रम अधिकारी पवन जगताप, जिजामाता महाविद्यालय एनसीसीचे लेफ्टनंट पवन ठाकरे, रासेयो
कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे, नेहरु युवा केंद्राचे सेवानिवृत्त सहाय्यक धनंजय चाफेकर
व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
भारत
सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेले नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय
सेवा योजना, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता
सुरक्षा जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. उपप्रादेशीक परिवहन कार्यालय व वाहतूक
शाखा पोलीस विभाग बुलढाणा यांच्या सहकार्याने अयोजित या अभियानात हेल्मेट व सीटबेल्टचा
वापर करा, नशा करुन वाहन चालवू नका, अपघात प्रसंगी जख्मीना मदत करा, रस्ता सुरक्षा
नियम पाळा असे संदेश पथनाट्यामध्यून राष्ट्रीय सेवा योजना व श्री संत गजानन महाराज
कॉलेज ऑफ फॉर्मसी बुलढाणाच्या विद्यार्थ्यांनी दिला.
0000000
Comments
Post a Comment