सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 

             बुलडाणा, (जिमाका) दि. 14 :  जिल्हा सैनिक कार्यालय बुलढाणा येथे माजी सैनिक, इतर प्रवर्गातुन तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मुलांचे वसतिगृहात चौकिदाराचे (अशासकिय) एक पद भरावयाचे आहे. सदर पदाकरीता इच्छुक सैन्यदलातील सेवानिवृत्त असलेले व इतर नागरीकाकडून दि. 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. वैयक्तिक अर्जासोबत अर्जदाराने आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक व दहावी पास प्रमाणपत्र, अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक ओळखपत्र जोडावे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या