जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर

 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 31:  जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांची मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले आहे.

            सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये स्तनाचा कर्करोग, स्त्री गर्भाशय कर्करोग, मुख कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असून कर्करोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञव्दारे तपासणी केली जाणार आहे. तरी या शिबीराचा लाभ घ्यावा.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या