कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
कुंभमेळा; जिल्ह्यातील
नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी
नागरिकांनी संपर्क करण्याचे
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 31: उत्तरप्रदेश राज्यातील
प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील
नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी
केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन
क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या कुंभमेळ्यातील आपत्कालीन
स्थितीत प्रयागराज कंट्रोल रुम टोल फ्री क्रमांक 1920, दुरध्वनी क्रमांक
0522-2237515 उपलब्ध केला आहे. तसेच मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून
त्या संपर्क क्रमांक 022-22027990 असा आहे. त्यासोबतच अमरावतीचे विभागीय आयुक्त
कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 0721-2661364 या क्रमांकावर संपर्क साधता येणार
आहे. यासह जिल्हा पोलीस नियत्रंण कक्षाने. 07262-242400 तसेच जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक 07262-242683 हा उपलब्ध
केला आहे. प्रयागराज येथील
कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या
हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले
आहे.
000000
Comments
Post a Comment