पोक्सो व बाल विवाह कायद्याची अंमलबजावणी करा- ॲड संजय सेंगर
पोक्सो
व बाल विवाह कायद्याची अंमलबजावणी करा- ॲड संजय सेंगर
बुलडाणा, (जिमाका) दि. 23: महाराष्ट्र
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आले होते. यावेळी त्यांनी बालकांच्या क्षेत्रातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था आणि
यंत्रणेला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पोक्सो
आणि बाल विवाह कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे सूचना ॲड. सेंगर यांनी दिले.
जिल्हाधिकारी
यांच्या दालनात बालकांच्या कायद्यांवर काम कारणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित
करण्यात आली होती. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी
शितल बजाज, उज्ज्वला कस्तुरे, गोरक्षनाथ भालेराव, पोलीस उपअधीक्षक महामुनी, बाल कल्याण
समिती अध्यक्ष सदस्य डॉ मनोज डांगे, ॲड. वर्षा वावगे, जयश्री शिंदे, जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, बाल कामगार
विभागाचे अधीक्षक हुडेकर तसेच जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग
आणि बाल कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आढावा बैठकीमध्ये ॲड. सेंगर यांनी पोक्सो आणि बाल विवाह
कायद्याच्या कठोर अंमलबजावणीबाबत चर्चा केली. बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवक
यांच्यामार्फत बालविवाह संबंधी तक्रारी दाखल करुन कड़क कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यातील
बालकांच्या क्षेत्रात कार्यरत सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधून बालकांच्या
कायद्या व अधिकाराबाबत जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या. त्यानंतर महिला व बाल विकास
विभागाच्या अधिनस्त असलेले बालकांच्या क्षेत्रातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था
आणि यंत्रणा यांना भेट देण्यात आली. त्यामध्ये महिला बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण
कक्ष, जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, बालकामगार शिक्षण,
आरोग्य विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय मुलांचे बालगृह, निरीक्षण गृह, शिशु
बालगृहाचा समावेश होता. यावेळी त्यांनी बालकांच्या
काळजी व संरक्षणात असलेल्या बालकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच त्या बालकांना योग्य
कुटुंब मिळेल याची खात्री करावी. काळजी आणि संरक्षणाची बालके यांच्या संदर्भात विविध
प्रकरणा संदर्भातील आढावा घेऊन अवलोकन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन
करताना म्हणाले की, 1098 चा प्रसार व प्रचार करावा. जेणेकरून बालकांना आणि सामान्य
जनतेला याबाबत तक्रार करणे साईचे होईल. जिल्ह्यात असलेल्या बालकांच्या दिव्यांग शाळा
आणि खाजगी व्यवस्थापन यांना भेटी देणे तसेच बालकांच्या हितासंबंधित सामाजिक संस्था
यांना फिट पर्सन म्हणून घोषित करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 0000000000
Comments
Post a Comment