आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडी

 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडी

 

        बुलढाणा,दि.29 (जिमाका) : संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे व त्याचे औचित्य साधून सहकार खाते व सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले असून 31 जानेवारी रोजी मेहकर येथे दाखल होणार आहे.

 

सहकार दिंडी मेहकर शहरामध्ये दि. 31 जानेवारी रोजी प्रवेश करणार असुन सदर दिंडी हि सोनाटी चौक– बायपास रोड लोणार कडे-कॉटन मार्केट रोड – खालचे बसस्टॅंड – व्यापारी लाईन –महेश अर्बन समोरील रोड – पोस्ट ऑफीस रोड – सत्यजीत अर्बन–जानेफळ चौक – गजानन महाराज मंदिर डोणगाव रोड मार्गाने जाणार आहे. सहकारी दिंडीचे तोरणे, पताका, रांगोळी, गुढी उभारुन स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थाचे सहकार निबंधक यांनी दिली.

 

सहकार दिडींच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभागृहात आढावा घेऊन सहकारी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आला. यावेळी सत्यजीत अर्बन को.ऑप.क्रे.सो.मेहकरचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माधवराव जाधव, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सुदर्शन भालेराव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार संतोष मापारी, तालुक्यातील विविध प्रकारच्या संस्थाचे अध्यक्ष, संचालक पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या