‘विकसित भारत यंग लीडर्स’ चर्चासत्रात युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत उपक्रम

 

‘विकसित भारत यंग लीडर्स’ चर्चासत्रात युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत उपक्रम

 बुलढाणा, (जिमाका) दि. 29: केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ उपक्रमांतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स’ चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमांत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.

या उपक्रमांत देशभरातून निवडलेल्या तीन हजार तरुण व तरुणी दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताचे व्हिजन मांडता येणार आहे. चर्चासत्रकाळात तरुणांना देशविदेशातील तरुण आयकॉन्ससोबत चर्चा करण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार आहे. 

या कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताविषयी त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे. सर्वोच्च निर्णय घेणारे आणि प्रसिध्द जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांशी जोडल्या जाणार आहे. विकसित भारताचे नेतृत्त्व करण्यासाठी तरुणांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

चार टप्प्यात होणार निवड

विकसित भारत यंग लीडर्स चर्चासत्राच्या माध्यमातून या तरुणांची चार टप्पयात निवड केली जाणार आहे. पहिला टप्पा विकासित भारत प्रश्नमंजुषा ही ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली जाईल. यात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक पोर्टलवर नोंदणी करुन भाग घेऊ शकणार आहेत.

पहिल्या टप्प्यात निवडलेले युवक दुसऱ्या टप्प्यातील विकासित भारत ब्लॉग, निबंध स्पर्धेत सहभागी होतील. निवडक युवक तिसऱ्या टप्प्यातील विकसित भारत राष्ट्रीय पिच डेक-स्टेट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यातील विजेते अंतिम टप्प्यातील विकसित भारत राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील. पहिला टप्पा २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत भारत सरकारच्या पोर्टलवर आयोजित केलेला आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत विकासित भारत यंग लीडर्स चर्चासत्रामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा. या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी दि. ५ डिसेंबर २०२४ पर्यंत mybharat.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या