विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमीत
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; विविध बाबींवरील निर्बंध
आदेश निर्गमीत
बुलडाणा,(जिमाका), दि.14 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम
घोषित करण्यात आला असून जिल्ह्यात बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी
6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आचारसंहिता कालावधीत कोणताही भंग होऊ नये यासाठी भारतीय
नागरीक सुरक्षा न्याय संहिता-2023 चे कलम 163 अनव्ये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर
करुन जिल्ह्यातील संपूर्ण कायक्षेत्रात दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 6 वाजेपासून ते
दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीकरीता विविध
बाबींवर निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले
आहे.
आदेश याप्रमाणे : उक्त कालावधीत बेकायदेशिर
जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचारसभा आयोजनास बंदी राहील. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
करीता मतदान पथके मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक
वा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणाऱ्या
किंवा जो जसाश तसा ऐकविणाऱ्या उपकरण संच लावण्यास, वापरण्यास, चालविण्यास प्रतिबंध
करण्यात येत आहे. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपाचारीक ओळखचिठ्ठया साध्या पांढऱ्या
कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवारांचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रीत
करण्यावर बंदी राहील. मतदानकेंद्रचे 100 मीटर पिरसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता
इतर सर्व वाहनांस बंदी राहील. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान
प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर व्यक्तिस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल. मतदारांना
लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपट दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच
मतदान केंद्राचे 100 मीटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहील.
मतदारांना मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर
ने आण करण्याचे प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खाजगी कार, ट्रॅक ऑटोरिक्शा, मिनी
बस, स्टेशंन व्हॅन, स्कूटर, मोटार सायकल इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनावर बंदी राहील.
मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्या वाटपाच्या ठिकाणी
किंवा मतदान केंद्राचे परिसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्ह आणि इतर प्रचार साहित्य
यांचे प्रदर्शन करण्यास बंदी राहील. ज्या व्यक्तिच्या सुरक्षितेला धोका असल्याबाबत
खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल, अशी कोणतीही व्यक्ति त्याच्या
सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदार केंद्राचे 100 मिटर परीसरात प्रवेश करणार नाही. अशी व्यक्ति
मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरीता सुरक्षा कर्मचाऱ्यासही मतदार केंद्र परीसरात
ये जा करण्यावर निर्बंध राहील, तथापी विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केल्या व्यक्तिच्या
विशेष सुरक्षा पथकास शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्ती
सोबत जाता येईल. एका वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यास शस्त्राचे प्रदर्शन न करता तसेच मतदान
प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्ष व्यक्तीस मतदान केंद्रात सोबत करता
येईल.
ज्या व्यक्तिच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत
खात्री पटल्यामुळे सरकारी सुरुक्षा पुरविण्यात आलेली असेल किंवा त्या व्यक्तिकडे खाजगी
सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तिस निवडणूक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास
बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट इत्यादी
नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष,आचारसंहिता
कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख/निवडणूकीच्या कर्तव्यावरील सुरुक्षा कर्मचारी यांना
उक्त प्रतिबंध लागू राहणार नाही.
निर्बधांचे कालावधीत खालील बाबींवर बंदी असणार
नाही.
बुलडाणा जिल्ह्यामधील विधानसभा मतदार संघात
निवडणूक प्रचार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता पासून बंद होत असला
तरी, घरोघरी प्रचारावर निर्बंधाचे कालावधीत प्रतिबंध असणार नाही परंतु 5 पेक्षा अधिक
व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, ॲम्बुलन्स, दुधगाड्या,
पाण्याचे टँकर्स,विद्युत विभाग/पोलीस/निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहीत मागार्ने जाणाऱ्या
बस गाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेंशन, रेल्वे स्टेशन हॉस्पीटल
कडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांगि किंवा आजारी व्यक्तिस मतदान केंद्रावर
मतदान करण्यासाठी जाणे-येणे करीता आजारी किंवा दिव्यांग व्यक्तिचे वैयक्तिक वाहनास
बंदी असणार नाही.
सदर आदेश बुलडाणा जिल्ह्यामधील संपूर्ण क्षेत्राकरीता
दि. 18 नोव्हेंबर 2024 चे सायंकाळी 6 वाजता पासून ते विधानसभा मतदानाच्या दिवशी दि.20
नोव्हेंबर 24 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील. तथापी हा आदेश सर्व निवडणूक
कामकाजाशी संबधीत अधिकारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरिक्षक
यांना लागू राहणार नाही. या आदेशचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय नागरिक
सुरक्षा न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कार्यवाही करण्यात यईल, असे प्रशासनाव्दारे
कळविण्यात आले आहे.
00000000
Comments
Post a Comment