उप आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील मतदान पूर्व तयारीचा आढावा; निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतपणे राबवावी - उप आयुक्त हिर्देश कुमार
उप आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील मतदान
पूर्व तयारीचा आढावा;
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतपणे राबवावी - उप आयुक्त हिर्देश कुमार
बुलढाणा, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक
प्रक्रिया पारदर्शकतपणे राबवावी, असे निर्देश उपआयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांनी
दिले.
भारत निवडणूक आयोगाचे उप आयुक्त हिर्देश
कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे बुलढाणा
जिल्ह्यातील मतदान पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॅा. किरण पाटील, निवडणूक निरीक्षक स्मिता सभरवाल, सीमा सरकार, नरेश झा, दानिश
अब्दुल्लाह, नवनीत कुमार, गुरमीतसिंग चौहान, सातही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी,
नोडल अधिकारी उपस्थित होते.
उप आयुक्त हिर्देश कुमार आणि मुख्य निवडणूक
अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आढावा बैठकीत मतदार यादी, मतदान कार्ड, मतपत्रिका वितरण,
राजकीय पक्ष व पोलींग एजंटचा सहभाग, स्ट्राँग रुम, सीसीटिव्ही, सुरक्षा व्यवस्था, मतदान
व मतमोजणी केंद्रांवरील सुविधा, वेब कास्टींग, कायदा व सुव्यवस्था, आचारसंहिता उल्लंघनाचे
प्रकरण,जप्ती, ईव्हीएम, फेक न्यूज, मनुष्यबळ, मतदार जनजागृती, अचूक मतदान टक्केवारीची
माहिती उपलब्ध करण्याबाबत व्यवस्था इत्यादी विषयांचा त्यांनी आढावा घेतला.
निवडणूक प्रक्रियेत पोलींग एजंटचा सहभाग
घ्यावा
मतदानासाठी कमी दिवस शिल्लक आहेत. मतदान
व मतमोजणी आणि गृहमतदान प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी किंवा पोलींग एजंटचा
सहभाग घ्यावा. वोटर स्लिप वाटप कराव्यात. तक्रारींचे निराकरण करावे. निवडणूक प्रक्रिया
पारदर्शकतपणे राबवावी. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कार्यवाही करावी,
असे निर्देश उपआयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले.
तक्रारी 24 तासात निकाली काढा - निवडणूक
निरीक्षक स्मिता सभरवाल
निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीबाबत
समाधान व्यक्त करुन निवडणूक निरीक्षक स्मिता सभरवाल म्हणाल्या, निवडणूक आचारसंहिता
भंग, मतदान केंद्रांवरील पायाभूत सुविधा इत्यादी विषयीच्या तक्रारी २४ तासात निकाली
काढाव्यात. संवेदनशिल कार्यक्रमांचे चित्रिकरण करा. पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्राच्या
ठिकाणी पार्कींग व्यवस्थेचे नियोजन करावे. अवैध रोकड वाहतुकीवर तात्काळ कारवाई करावी.
निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अंमलबजावणीमध्ये एकसमानता असावी, असे निर्देश निवडणूक
निरीक्षक स्मिता सभरवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.
मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगण्यावर बंदी
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा
वापर केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. अशा घटना होवू नये यासाठी मतदान केंद्रांमध्ये
मोबाईल बाळगण्याची परवानगी देवू नये, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
000000
Comments
Post a Comment