शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २३ वी सभा हिवरा गडलिंग येथे संपन्न

 





शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २३ वी सभा हिवरा गडलिंग येथे संपन्न

 बुलढाणा, (जिमाका) दि. 28: कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची २३ वी सभा सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे हिवरा गडलिंग येथे मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात पाटील यांच्या शेतात गुरुवारी संपन्न झाली.

या सभेस प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कानवडे,, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा, पशुसंवर्धन विषयतज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी बोरे,कृषी पर्यवेक्षिका वाघमारे, कृषी सहाय्यक घुगे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन काळे, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात पाटील, सचिव विजय भुतेकर, विनोद देशमुख, दोन्ही मंचचे सदस्य, हिवरा गडलिंग व परिसरातील शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानेश्वर पाटील खरात यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची स्थापना, त्यामागची कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ.पंदेकृवी, अकोला यांची संकल्पना व सद्यस्थितीत मंचाची २३ वी सभा असून याद्वारे प्रत्येक सदस्यांचे शेतीतील अनुभव व शास्त्राज्ञांद्वारे मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्व विषद करून मंचातील सदस्यांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रवास जलद व अविरत होत असल्याबाबत माहिती दिली.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी तूर व हरभरा पिकातील बुरशीजन्य रोगाचे व्यवस्थापन व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तूर व हरभरा पिकांमध्ये बुरशीजन्य रोगामुळे होणारे नुकसान व उत्पादनावर पडणारा फरक व शेतकऱ्यांनी या रोगांचे व्यवस्थापन करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांसोबत विविध विषयावर हितगुज करून शेतकऱ्यांच्या पिकांमधील रोग व किडीबाबतच्या समस्या जाणून घेत उपाययोजना सांगितल्या.

प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कानवडे यांनी तृणधान्य व भरडधान्याचे आहारातील महत्त्व व लागवड पद्धती तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. तृणधान्य व भरडधान्याचे आहारात समावेश करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

 

डॉ. नरेंद्र देशमुख यांनी गावकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या पशुधनासाठी मुरघासाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो बाबत माहिती दिली. मुरघास कसा तयार करावा, त्याचा वापर केल्यानंतर जनावरांनी मध्ये काय फरक दिसतात व जनावरांसाठीच्या उपयुक्ततेबाबत सविस्तर माहिती दिली.

 

यावेळी कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी बोरे यांनी कृषी विभागामार्फत असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

 

सर्व तज्ञांचे मार्गदर्शन झाल्यानंतर शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य गुंजकर अप्पा, दत्तात्रय टेकाळे., पवन साठे, हरिभाऊ येवले, विनोद देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तद्नंतर तूर पिक प्रक्षेत्रावर सर्वांनी भेट देऊन तुर पिकातील विविध समस्या, प्रमुख किडी व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांसमवेत चर्चा केली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हवामान शास्त्रज्ञ मनेश यदुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर खरात पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञांनी व हिवरा गडलिंग येथील ग्रामस्थांनी प्रयत्न घेतले.

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या