जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

बुलडाणा, (जिमाका) दि. 26:  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी अपर  जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपजिल्हाधिकारी सुरेश खरात यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मूल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी अपर जिल्हाधिकारी श्री. शेलार यांनी उपस्थितांना माहिती दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी