डाक जीवन विमा
डाक जीवन विमा
बुलढाणा, (जिमाका) दि. 28: भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (Postal Life
Insurance) व ग्रामीण डाक जीवन विमा (Rural Postal Life Insurance) ह्या योजना
नागरिकांना विमासुरक्षा देण्याकरिता चालविल्या जातात.
यामधील डाक जीवन विमा (Postal
Life Insurance) ह्या कल्याणकारी योजनेची सुरूवात 01 फेब्रुवारी 1884 ला करण्यात
आली, यामध्ये सुरूवातीला फारच कमी लोकांना या योजनेचा लाभ घेता येत असे आता ह्या
आता मात्र ह्या योजनेची व्याप्ती वाढून आता खालील लोकांना सुध्दा सहभाग होता येते.
केंद्र सरकारचे कर्मचारी ,राज्या सरकारचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्या संस्थाचे
कर्मचारी, भारतीय रिझर्व बँक, सरकारी बँक,
खासगी बँक चे कर्मचारी शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ चे कर्मचार,
सनदी लेखापाल,वकील डॉक्टर, एनएससी,बीएससी वर सूचिबध्द झालेल्या कंपन्यांतील
कर्मचारी, सर्व पदवीधर व डिप्लोमाधारक तसेच ग्रामीण डाक जीवन विमा ही योजना 24
मार्च 1995 ला ग्रामीण भागातील नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु
करण्यात आली. वय वर्षे 18 ते 55 या वयोगटातील ग्रामीण भागातील रहिवासी या योजनेचा
लाभ घेऊ शकतो.
भारतीय डाक विभागामार्फत
चालविल्या जाणाऱ्या योजना कमी प्रीमिअम जास्त बोनस ह्यामुळे नागरिकांच्या पसंतीस
उतरत आहेत. आतापर्यंत जवळपास दीड कोटीहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.
उत्कृष्ट परतावा देणाऱ्या विमा
योजनेचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता दि. 4 डिसेंबर 2024 ला विशेष
मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन डाक अधीक्षक, गणेश
आंभोरे बुलडाणा विभाग, यांनी केले आहे. 000000000
Comments
Post a Comment