संविधानाची नितीमुल्ये दैनंदिन जीवनात आत्मसात केली पाहिजे - मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

 

संविधानाची नितीमुल्ये दैनंदिन जीवनात आत्मसात केली पाहिजे

-         मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा

बुलढाणा, (जिमाका) दि. 27: ‍जिल्हा परिषद बुलडाणा येथे दि. 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2025 पर्यंत साजरा करण्यात येणाऱ्या घर घर  संविधान अभियानांतर्गत  संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात हे होते. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

अध्यक्ष गुलाब खरात मनोगत व्यक्त करताना म्हणाले, संविधानाची नितीमुल्ये ही फक्त पुस्तकात न ठेवता दैनंदिन जीवनात ही तत्वे आत्मसात केली पाहिजे. संविधानाचा जागर व संविधान अमृत महोत्सव हा दरदिवशी साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले. श्री खरात यांच्या संकल्पनेतून संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. प्रश्नांची अचुक उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यास भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरुपात देण्यात आली, यात आकाश नवघरे, आरती गवाई, प्रतिक्षा दळे, अजित चव्हाण हे कर्मचारी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते ठरले.

या कार्यक्रमाला अति.मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, कार्यकारी अभियंता राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तृप्ती खेडेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल वानखेडे व आभार प्रदर्शन उमेश जैन यांनी केले. यावेळी  शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाळासाहेब खरात, सतीष गायकवाड, विशाल वानखेडे, हेमा पाचपोळे यांनी मनोगत व्यक्त केले.

0000000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या