मेहकर विधानसभा मतदारसंघात सावत्रा येथे एका नवीन मतदान केंद्राची निर्मिती; आता 350 मतदान केंद्र

 

मेहकर विधानसभा मतदारसंघात सावत्रा येथे एका नवीन मतदान केंद्राची निर्मिती; आता 350 मतदान केंद्र

 

बुलडाणा, (जिमाका) दि.12:  विधानसभा निवडणूकीत मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार 25- मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये सावत्रा येथे नवीन मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून आता मेहकर मतदारसंघात 350 मतदान केंद्र झाले आहेत.

 

मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी ज्या मतदान केंद्रांवर मर्यादेपेक्षा जास्त मतदार आहेत  किंवा दोन गावातील मतदार एकाच मतदान केंद्रांना जोडण्यात आलेले होते, असे सर्व मतदान केंद्र मिळून जिल्ह्यात नव्याने 23 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातील सावत्रा येथील मतदान केंद्र क्रमांक-81 जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदारांची संख्या असल्याने मतदान केंद्र क्रमांक-82 सावत्रा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक 2 येथे नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात 350 मतदान केंद्र झाले असून शहरी भागात 59 तर ग्रामिण भागात 291 मतदान केंद्र आहेत. नवीन मतदान केंद्राच्या निर्मितीमुळे कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहेत.

 

3 लक्ष 5 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 

 25-मेहकर मतदारसंघात 3 लक्ष 5 हजार 960 मतदार असून त्यामध्ये 1 लक्ष 59 हजार 378 पुरुष तर 1 लक्ष 46 हजार 578 महिला व 4 तृतीयपंथी मतदार आहेत. 85पेक्षा जास्त वयोमान असलेले मतदार 3 हजार 859 असून 1 हजार 400 पुरुष तर 2 हजार 459 महिला मतदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणा रे 7 हजार 866 नवमतदार असून 4 हजार 857 पुरुष तर 3 हजार 8 महिला व 1 तृतीयपंथी नवमतदार आहेत.

 

   लोकसभेला जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्र होती. यात 23 नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन 2 हजार 288 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरणांतर्गत मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

 

 

मतदान यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी- जिल्हाधिकारी

 

भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार केंद्र जाणून घेण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्राची माहिती शोधण्याच्या बाबतीत काही मदत हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांक किंवा मेहकर मतदारसंघासाठी हेल्प लाईन क्रमांक 18002336361 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या