विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदारांनी निर्भयपणे मतदानाचे हक्क बजाविण्याचे आवाहन > जिल्ह्यात 2 हजार 288 मतदान केंद्र, 21 लाख 34 हजार मतदार
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;
मतदारांनी निर्भयपणे मतदानाचे हक्क बजाविण्याचे आवाहन
> जिल्ह्यात 2 हजार 288 मतदान केंद्र, 21 लाख 34 हजार मतदार
बुलडाणा, (जिमाका) दि. 5: विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक-2024 च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे आपल्या
मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण
पाटील व निवडणूक निरिक्षक सामान्य स्मिता सभरवाल, नरेश झा, सिमा सरकार व पोलीस निवडणूक
निरिक्षक गुरमीतसिंग चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यातील
7 विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 288 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून
सुमारे 21 लाख 34 हजार 500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक
प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या
सुविधेसाठी विविध मोबाईल ॲप सुरु केलेल आहेत. इनकोअर, सुविधाॲप, सक्षम ॲप, केवायसी
ॲप, सिव्हीजील, व्होटर टर्नआऊट ॲपचा समावेश आहे. वरील सर्व ॲप मतदारांच्या सुविधेसाठी
असून पारदर्शक व भितीमुक्त निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच निवडणूक
संदर्भातील तक्रारीसाठी निवडणूक निरिक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी व निवडणूक निरिक्षक यांनी
केले. यावेळी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार
: दि. 30 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या
21 लक्ष 34 हजार 500 असून यामध्ये पुरुष मतदार 11 लक्ष 9 हजार 791, महिला मतदार 10
लक्ष 24 हजार 671 तर तृतीयपंथी मतदार 38 आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : 21-मलकापूर विधानसभा
मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 50 हजार 56, महिला मतदार 1 लक्ष 38 हजार 326 तर तृतीयपंथी
6 असे एकूण 2 लक्ष 88 हजार 385 मतदार आहेत. 22- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष
मतदार 1 लक्ष 59 हजार 452, महिला मतदार 1 लक्ष 47 हजार 638 तर तृतीयपंथी 16 असे एकूण
3 लक्ष 7 हजार 106 मतदार आहेत. 23- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष
57 हजार 170, महिला मतदार 1 लक्ष 48 हजार 546 तर तृतीयपंथी 2 असे एकूण 3 लक्ष 5 हजार
718 मतदार आहेत. 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 68 हजार
601, महिला मतदार 1 लक्ष 54 हजार 393 तर तृतीयपंथी 1 असे एकूण 3 लक्ष 22 हजार 995 मतदार
आहेत. 25-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 378, महिला मतदार
1 लक्ष 46 हजार 578 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 960 मतदार आहेत.26- खामगांव
विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 55 हजार 632, महिला मतदार 1 लक्ष 42 हजार
285 तर तृतीयपंथी 5 असे एकूण 2 लक्ष 97 हजार 922 मतदार आहेत. तर 27-जळगाव जामोद विधानसभा
मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 505, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 905 तर तृतीयपंथी
4 असे एकूण 3 लक्ष 6 हजार 414 मतदार आहेत.
जिल्ह्यात 2 हजार 228 मतदान केंद्र : जिल्हयात
लोकसभेसाठी 2265 मतदान केंद्र होती.यात 23 नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा
निवडणूक 2024 साठी जिल्ह्यामध्ये 2288 मतदान केंद्र आहे. यामध्ये मलकापूर येथे
305, बुलढाणा येथे 337, चिखली 317, सिंदखेड राजा 340, मेहकर 350, खामगांव 322 तर जळगाव
जामोद येथे 317 असे एकूण 2 हजार 228 मतदान केंद्र आहे. एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के
मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.
जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत तर 72
उमेदवारांची माघार : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील
सातही मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 72 उमेदवारांनी आपले
अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 115 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. मलकापूर
येथे 15, बुलढाणा येथे 13, चिखली येथे 24, सिंदखेड राजा येथे 17, मेहकर येथे 19, खामगांव
येथे 18 व जळगांव जामोद येथे 9 असे एकूण 115 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तसेच नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले,
ते याप्रमाणे : मलकापूर येथे 7, बुलढाणा येथे
8, चिखली येथे 18, सिंदखेड राजा येथे 18, मेहकर येथे 11, खामगांव येथे 4 व जळगांव जामोद
येथे 6 असे एकूण 72 उमेदवारांचे नामनिर्देशन उमेदवारी मागे घेतले आहेत.
सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार
आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर
घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार
असल्याचे सांगितले.
मतदारांनो, व्होटर हेल्पलाईन ॲपवर नाव शोधा
: व्होटर हेल्पलाईन ॲपवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून
मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
यांनी केले.
ओळखीसाठी 12 पुरावे ग्राह्य : विधानसभा सार्वत्रिक
निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त
इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर
संबंधितांना मतदान करता येणार आहे.
आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा
पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत
जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल
ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय
पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक
लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जारी
करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने
जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य
धरण्यात येणार आहेत.
दिव्यांग व वयोवृद्धासाठी गृहमतदान : दिव्यांग
व 85 पेक्षा जास्त वयोमानातील मतदारांन निवडणूकीमध्ये मतदान करता यावे यासाठी भारत
निवडणूक आयोगाने होम वोटींगची सुविधा देण्यात आली आहे.त्यानुसार 3 हजार 107 जेष्ठ नागरिक,
674 दिव्यांग असे एकूण 3 हजार 781 जेष्ठ नागरीक व दिव्यांगाचे घरपोच मतदान करणे सोईचे
होण्यासाठी 160 पथकामार्फत दि. 14, 15 व 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान गृह मतदान करुन
घेतले जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी
इनकोअर, सुविधाॲप, सक्षम ॲप, केवायसी ॲप, सिव्हीजील, व्होटर टर्नआऊट ॲप उपलब्ध करुन
दिले आहे. हे सर्व ॲप मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी
सर्वांनी सहकार्य करावे.
000000
Comments
Post a Comment