Tuesday 7 December 2021

DIO BULDANA NEWS 7.12.2021


 जीवनात संघर्ष आल्यास बाबासाहेबांचे विचार अंगिकारून यश मिळवावे

                                      - जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
बुलडाणा, (जिमाका) दि. 7: आजच्या युगात मुलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंभु होउन स्वतः चा उदयोग सुरू करावा. यासाठी शासन आपल्या सोबत आहे. आपण बाबासाहेबांसारखे निर्भीडपणे जिवन जगावे, जिवनात संघर्ष आला असेल, तर बाबासाहेबांचे संघर्ष करीत यश प्राप्त करून देणारे विचार अंगिकारावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले.     
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त६ डिसेंबर रोजी सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे,  समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे  महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतुन उदयोजगता परीचय व कोशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
  या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस रामामुर्ती  यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, जात पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी मनोज मेरत,  सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, अशोक नारखेडे,  संदीप कपले,  बार्टी जिल्हा प्रमुख महेंद्र शामदे सह सर्व समतादुत उपस्थित होते .
   सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व त्यानंतर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदधाटन करण्यात आले .यावेळी शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह चिखली च्या मुली कु सोनु ढंगारी,  नेहा साळवे,  अलका लोखंडे,  रेणुका उंबरकर,  निवासी शाळा कोलवड चे विदयार्थी योगेश जाधव,  पर्वत लांडगे,  सिध्दांत इगळे,  प्रतिक मोरे,  शासकिय वसतिगृह बुलडाणा च्या मुली कु दिक्षा मुळे,  विभा वानखेडे,  काजल इंगळे,  स्नेहा पैठणे आदींना जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
   प्रास्ताविक डॉ अनिता राठोड यांनी उदयोजकता प्राशिक्षणात कार्यालयाचे  योगदानबाबत माहिती दिली.  जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी शासनाच्या उदयोगाबदलच्या सर्व योजनांची माहिती दिली. तसेच ऑन लाइन मैत्री पोर्टल,  जेम पोर्टलचा कसा वापर करावा हेही सांगितले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज मेरत यांनी केले तर संचालन तालुका समन्वयक सतिश बाहेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी बार्टीचे समतादुत मोसिन खान, धम्मदिप म्हस्के, कृष्णा आळंदकर, शुभांगी सरकटे,  मीलींद डोगरदिवे यांनी प्रयत्न केले. यावेळी महात्मा फुले समाजकार्य महाविदयालयाचे सर्व शिक्षक,  विदयार्थी हजर होते.
*******

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 10 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’
* 2 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 33 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 10 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 284 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 284 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 66 व रॅपिड टेस्टमधील 218 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 284 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच उपचार अंती 2 रूग्ण कोविड मुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 
  त्याचप्रमाणे आजपर्यंत 739381 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86969 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86969 आहे. आज रोजी 489 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 739381 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87654 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86969 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 10 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 :  सशस्त्र सेना ध्वजदिन दिनाचे औचित्य साधून आज 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्याहस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ध्वजदिन निधीचा बॅच लावून निधी संकलनाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान उपस्थित होते. त्यांनी मागील वर्षी संकलित करण्यात आलेल्या निधीची माहिती देत या वर्षासाठी मिळालेल्या उद्दिष्टाबाबत अवगत केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे व आपले जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन केले. 

No comments:

Post a Comment