Saturday 18 December 2021

DIO BULDANA NEWS 18.12.2021

 जिल्ह्यात लाळ खुरकत लसीकरण मोहीम

बुलडाणा, (जिमाका) दि. १८: जिल्ह्यात  राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरणाची दूसरी फेरी १५ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान  राबविण्यात येत आहे. जिल्हयासाठी २ लक्ष ९५ हजार ७०० लस मात्रा पुरवठा झालेला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी अथवा पशुपालकांनी आपल्या जनावरांना लाळ खुरकत लसीकरण करुन घ्यावे,  असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.
*******

ग्रामपंचायत व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कारवाई
बुलडाणा, (जिमाका) दि. १८: राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दै  तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ०१ डिसेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये एकूण ४७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४३ वारस गुन्हे, ४ बेवारस गुन्हे नोंदवुन ४३ आरोपींना अटक करण्यात आली.  तसेच २ वाहनासह एकुण ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी होणा-या ग्रामपंचायत व नगर पंचायतीच्या निवड णुकांच्या पार्श्वभुमीवर प्र.निरीक्षक आर.आर.उरकुडे, व्हि.आर.बरडे, दुय्यम निरीक्षक एस.जी.मोरे, पी.व्ही.मुंगडे यांचे पथकाने हॉटेल शिवराणा,घुस्सर शिवार ता.मोताळा जि.बुलडाणा देशी मद्य २५.९२ लिटर व विदेशी मद्य ४०.३२ लिटर, बिअर ७०.२ लिटर असा एकुण ६३ हजार ७६०  रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
  आरोपी सावंतसिंग मदनसिंग राजपुत, रा.राणा प्रताप नगर,मलकापुर यांचेविरूध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कार्यवाहीत जवान आर.एच. सोभागे, पी.ई.चव्हाण, ए.पी.तिवाने, आर.ए.कुसळकर, एन. एम.सोळंकी, एम.एस.जाधव सहभागी होते. आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास या विभागाचे टोल फी नंबर १८००८३३३३३ वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळवावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालवितांना वाहनांचा परवाना आवश्यक आहे त्याप्रमाणे मद्य बाळगतांना,मद्य सेवण,मद्य वाहतुक करतांना या विभागाचा मद्यसेवन परवाना असणे आवश्यक आहे.तसेच अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करतांना अथवा मद्यविक्री करतांना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल. 
  त्याचप्रमाणे  ९ डिसेंबर २०२१ रोजी हॉटेल निर्सगराज मौजे मलकापुर पांग्रा शिवार ता.सिंदखेडराजा  येथे दारुबंदी गुन्हयांतर्गत छापा मारला असता देशी व विदेशी मद्य आढळुन आले तसेच ग्राहकांना मद्य पुरवठा करुन बसण्या करीता जागा उपलब्ध करुन दिली.  त्यामुळे ढाबाचालक प्रविण मधुकर जाधव यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई व ६८ व ८४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच मद्यसेवन करणारे सौरभ मधुकर मिसाळ यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ गुन्हा नोंदविण्यत आला आहे, असे अधीक्षक श्रीमती जाधव यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment