Monday 27 December 2021

DIO BULDANA NEWS 27.12.2021,1

जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण व थकीत पर्यावरण कर भरावा • उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.27 : ज्या खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीन चाकी वाहनांची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेली आहे. अशा वाहनांची नोंदणी 15 वर्षानंतर विधी ग्राह्य नाही. वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य आहे. अन्यथा विधीग्राह्यता संपलेल्या वाहनांवर कार्यालयाचे तपासणी पथकामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या खाजगी वाहनांना नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेली आहे व परिवहन संवर्गातील मालवाहतूक करणारे लोडींग ॲटो, टेम्पो, ट्रक, बसेस यांना वयोमर्यादा 8 वर्ष पूर्ण झाली आहे. अशा वाहनांना पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे. विहीत कालावधीत पर्यावरण कर भरणा न केल्यास 2 टक्के प्रती महिना व्याज आकारण्यात येते. ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे, अशा वाहन धारकांनी तातडीने थकीत कराचा भरणा करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भरारी पथकाद्वारे होणारी कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. ***** शेतकरी प्रशिक्षण प्रक्षेत्र भेटीसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे बुलडाणा,(जिमाका) दि.27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय अनुसंधान परीषदे अंतर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र पुणे, नगर व सोलापूर येथे कार्यरत आहे. फलोत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्यावतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डांबरे यांनी केले आहे. अर्जदारासाठी अटी : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे निवड करण्यात येईल, शेतकऱ्याच्या नावे 7/12 व नमुना 8 अ असावा, वयोमर्यादा 18 ते 45 असावी, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स असावी, पासपोर्ट आकराचा एक फोटो असावा. ******
जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यशाळा उत्साहात बुलडाणा,(जिमाका) दि.27 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात 24 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यशाळा उत्साहात पार पडली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमातंर्गत अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव, माहिती होण्यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यशाळेचे कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प बांधकाम सभापती रियाजखाँ पठाण, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, श्री. चोपडे आदी उपस्थित होते. तसेच अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ॲड वसीम कुरेशी यांनी पीपीटीद्वारे अल्संख्यांक समाजाच्या विकासासाठी असणाऱ्य योजनांची माहिती सादर केली. प्रास्ताविक सहा जिल्हा नियोजन अधिकारी मोनिका रोकडे यांनी केले. संचलन नायब तहसिलदार अनंता पाटील यांनी तर आभार अधिक्षक श्रीमती शामला खोत यांनी मानले. ***** कॅच द रेन पोस्टरचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन बुलडाणा,(जिमाका) दि.27 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याहस्ते 24 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गणेश सुर्यवंशी उपस्थित होते. या कॅच द रेन अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जतन करण्याबाबत नेहरु युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व युवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अजयसिंग राजपूत यांनी यावेळी दिली. ******** जिल्हास्तर युवा महोत्सवाचे दि. 31 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजन बुलडाणा,(जिमाका) दि.27 : राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 31 डिसेंबर 2021 रोजी आभासी पध्दतीने (ऑनलाईन) करण्यात आले आहे. सदर युवा महोत्सव मध्ये लोकगीत व लोकनृत्य या दोन कलांचा समावेश राहणार असुन लोकगीत साठी साथसंगत देणाऱ्यासह जास्तीत जास्त दहा स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धेमध्ये वीस स्पर्धक सहभागी होऊ शकतील. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणाऱ्याचे वय हे 15 ते 29 या वयोगटात असणे आवश्यक आहे. लोकनृत्य सादर करणाऱ्या संघाने पुर्वाध्वनीमुद्रीत टेप अथवा रेकॉर्डींगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे. स्पर्धेसाठी प्रवेशिका दि.30 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी. त्यानंतर येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. वेळेवर कोणत्याही संघास व कलाकारास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बाबनिहाय प्रवेश अर्जानुसार स्पर्धकांची वेळ निश्चीत करुन त्या-त्या स्पर्धकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात येतील. तसेच ज्या स्पर्धकांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील, त्यांना लिंकद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येवुन प्रथम क्रमांकाचा स्पर्धक विभागीय युवा महोत्सवाकरीता पात्र होईल. सहभागी कलावंत (स्पर्धक) यांनी आपले प्रवेश अर्ज, मोबाईल नंबर, पत्ता, संस्थेचे नांव, इ. सह या कार्यालयामध्ये नोंदणी करावी. त्यानंतरच कार्यक्रमाची रुपरेषा संबंधितांना कळविण्यात येईल. देशात कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन एकत्रीकरण करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. ********* --

No comments:

Post a Comment