Wednesday 1 December 2021

DIO BULDANA NEWS 1.12.2021

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 07 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 31 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 07 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 356 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 356 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 129 व रॅपिड टेस्टमधील 227 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 356 अहवाल निगेटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 737552 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86964 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86964 आहे. आज रोजी 180 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 737552 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87646 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86964 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 07 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ******* खेलो इंडीया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र सुरु बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे संयुक्त विद्यमाने खेलो इंडीया सेंटर अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडीया सेंटर मंजुर करण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा अंतर्गत तलवारबाजी या खेळाचे सेंटर मंजुर झाले असून, त्याचा शुभांरभ दि.24.11.2021 रोजी तालुका क्रीडा संकुल चिखली येथे करण्यात आला आहे. सदर तलवारबाजी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची निवड चाचणी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव मार्गदर्शनात दि.23.11.2021 रोजी जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे संपन्न झाली. या चाचणीसाठी बुलडाणा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव शेषनारायण लोढे (शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी) जिल्हा क्रीडा अधिकारी, अक्षय गोलांडे (प्रशिक्षक) शुभम सुरडकर, मोहम्मद सुफीयान, तसेच कार्यालयाचे महेश खर्डेकर रा.क्री.मा., अनिल इंगळे, रा.क्री.मा उपस्थित होते. ही चाचणी यशस्वीतेसाठी या कार्यालयाचे क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, श्रीमती मनिषा ढोके, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी सहकार्य केले. या निवड चाचणीकरीता जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थी/विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चाचण्यांमधून पात्र खेळाडूंची 15 मुले व 15 मुली असे एकुण 30 खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षक अक्षय गोलांडे यांचे दररोज सकाळ व सायंकाळ या सत्रात प्रशिक्षण मिळणार आहे. यामधूनच भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होवून पुढील काळात होणाऱ्या सन 2024, 2028, 2032 च्या ऑलिम्पीकसाठी खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. ***** अवादांकीत प्रलंबित बदल अर्जांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुलडाणा येथे अवादांकीत प्रलंबित बदल अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यात येणार आहे. त्यासाठी 13 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी बार असोसिएशनसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त प्र. नि आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ****** अनपेड मोटार वाहन केसेस पेड करून घेण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जिल्ह्यातील वाहतूक शाखा व विविध पोलीस स्टेशनमार्फत वाहतूक नियमभंग करणाऱ्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमातंर्गत दंड आकरण्यात आलेला आहे. यापैकी काही वाहनधारकांनी दंडीत रकमेचा भरणा केला असून काही वाहनधारकांकडून दंडाची रक्कम भरणा करणे अद्याप पावेतो बाकी आहे. तरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्फत 1 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान जिल्ह्यात केंद्र शासनाच्या लोकअदालत मोहिमेतंर्गत मोटार वाहन कायद्यान्वये वाहन चालकांवर केलेल्या कसेसमधील थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी 1 ते 10 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत असून त्याचा लाभ जनतेने घ्यावा. या कालावधीत थकीत दंड न भरल्यास 11 डिसेंबर रोजी सर्व तालुका न्यायालयात थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करण्याकरीता लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. तरी सदर दिवशाी न्यायालयात जावून आपला दंड भरून शासनास सहाकार्य करावे, असे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक एस. आर पाटील यांनी केले आहे. वाहनधारकांनी त्यांचे नजीकचे पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा किंवा कोणताही वाहतूक अंमलदार यांचेकडे जावून अथवा ऑनलाईन पद्धतीने त्यांचे वाहनांवरील थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करावा. दंडाची थकबाकी वाहनधारकांना त्यांचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे संदशे पाठविण्यात आला आहे. सदर मेसेजवर क्लिक केल्यावर थकीत दंड भरणेबाबत समन्स व वाहनावरील चालान आदी सविस्तर माहिती असलेले पीडीएफ मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल. सदर पीडीएफमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाहनधारक ऑनलाईन पद्धतीने दंडाच्या रकमेचा भरणा करू शकतील. अथवा नजीकच्या पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा किंवा कोणताही वाहतूक अंमलदार यांचेकडे जावून दंडाचा भरणा करू शकतील. *****
युवकांनी एड्स निर्मुलन चळवळीमध्ये सहभागी व्हावे - जिल्हा न्यायाधीश आर. एस मेहेरे * जागतिक एड्स दिन कार्यक्रम बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जागतिक एड्स दिनाच्या दिवशी सर्व युवकांनी प्रण करुन एड्स निर्मूलन चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. एच.आय.व्हि.संसर्गापासुन स्वतःचे व इतरांचे संरक्षण करावे, लग्नापुर्वी एच.आय.व्हि.तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांनी केले. जिल्हा रुग्णालय येथे जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एच.आय.व्हि. एड्स विषयक जनजागृतीपर विशेष मासीक कार्यक्रमांचे आयोजन व एड्स विषयी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जागतिक एड्स दिनानिमीत्त आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ठ कार्य करणा-या अधिकारी, कर्मचारी स्वयंसेवी संस्था यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी एड्स निर्मूलनाची शपथ दिली व सेल्फी स्टँडचे फित कापून उद्घाटन केले. मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे साजिद आरिफ सैय्यद, प्रांजली बावस्कर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभाग, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नितीन तडस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला डॉ.भुसारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.खिरोडकर, डॉ.चौधरी, डॉ. कदम,डॉ.राजपुत, मेट्रन कुळकर्णी, नर्सिंग स्कुलच्या प्राचार्या श्रीमती खेडकर, डॉ.सरोदे, म.फुले समाज कार्य महाविद्यालय,शरद कला महाविद्यालय, विदर्भ महाविद्यालय, बसंतप्रभा नसँग कॉलेज, वि.एस. पटेल महाविद्यालय,राजीव गांधी महाविद्यालय,शासकीय नसँग स्कुल यांचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर नेहरू युवा केंद्राचे अधिकारी व स्वयंसेवक, मातृभुमी फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ बुलडाणा, कृषीसमृध्दी फाऊंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डापकु कार्यालय, ए.आर.टी.सेंटर, आय.सी.टि.सी, एस. टि.डी, रक्तपेढी विभागातील अधिकारी व कर्मचारी, मातृभुमी फाऊंडेशन यांनी प्रयत्न केले. संचालन गजानन देशमुख यांनी तर आभार लक्ष्मीकांत गोंदकर यांनी केले. ****** जिल्ह्यात 15 लक्ष 26 हजार 433 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 29 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 15,26,433 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 72.52 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 1 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 43 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 8 आहे. जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे. ******

No comments:

Post a Comment