Friday 24 December 2021

DIO BULDANA NEWS 24.12.2021

कोविडच्या पार्श्वभूमीवर कलाकार व संस्था यांना मिळणार आर्थिक मदत संबंधित तहसिलदारामार्फत अर्ज सादर करावे बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : कोविड-19 च्या पार्क्ष्वभुमिवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार/ संस्था यांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यास्तव सदर प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंत यांनी परिशिष्ट-ब-1 एकल कलाकार (वैयक्तीक) अर्ज नमुन्यात वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत संबंधीत तालुक्यातील तहसिलदारामार्फत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे मार्फत करण्यात योत आहे. यासाठी अर्जदाराने लाभार्थी कलाकाराचे नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, राज्यातील वास्तव्य, आधार कार्ड, लाभार्थी कलाकाराचा बँक खात्याचा तपशिल व खाते क्रमांक, कलेच्या क्षेत्रात किती वर्षापासून कार्यरत आहे, लाभार्थी कलाकाराचे वार्षिक उत्पन्न आदी अर्जामध्ये देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्याचा रहीवासी दाखला, (स्थानिक स्वराज्य संस्थेचाही दाखला ग्राह्य) तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशिल, शिधापत्रीका सत्यप्रत पात्रता आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ गुजराण असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार असावा, महाराष्ट्र 15 वर्ष वास्तव्य असलेला असावा, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असलेला असावा, वार्षिक उत्पन्न 48 हजार रूपयांच्या कमाल मर्यादेत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतुन मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तीक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. वर्तमानपत्रात वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. 00000000 विद्यार्थ्यांच्या भोजन, निवासाचा खर्च शासन उचलणार • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना • अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना बुलडाणा, (जिमाका) दि. 24: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भेजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: खर्च करून घ्याव्या लागतात. महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात मर्यादा येतात. त्यसाठी राज्य शासनाने अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच बुलडाणा नगर पालिका हद्दीपासून 5 कि.मी च्या परीसरात असलेली महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. कोविड च्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानुसार सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज महाविद्यालयामार्फत 31 डिसेंबर 2021 पूर्वी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन असे आवाहन सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे. ***********
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना तपासून घ्याव्यात - जिल्हाधिकारी एस रामामूर्ती राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम बुलडाणा, (जिमाका) दि. 24: ग्राहकांनी कुठलीही वस्तू घेताना सुरूवातीला तपासून घ्याव्यात. कुठलीही वस्तू भेसळ विरहीत असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्याला अहितकारक असलेल्या वस्तू खरेदी करू नये. कुठेही फसवणूक झाल्यास संबंधित पोलीस स्टेशन अथवा विभागाला तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले. स्थानिक तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी सहायक पुरवठा अधिकारी व्ही डी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ताथोड, जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष डी. डी. ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी सहायक पुरवठा अधिकारी श्री. पाटील यांनी ग्राहकांनी कुठली वस्तू घेताना ती कशाप्रकारे तपासावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. ढवळे यांनी ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार कुठे दाखल करावी, याबाबत संबोधीत केले. प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक प्रशांत खैरनार यांनी केले, तर संचलन किसन केने यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने महसूल सहायक देवानंद चाळगे, गजानन कोळकर यांनी केले. ********
गावठाणच्या ड्रोन सर्वेक्षणाला आजपासून सुरूवात बुलडाणा, (जिमाका) दि. 24: भूमि अभिलेखच्यावतीने भारतीय सर्वेक्षण विभागाने आजपासून ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील सुंदरखेड, माळविहीर, सागवण, सावळा, बिरसिंगपूर या गावांमधील गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण आज करण्यात आले. या वेळी उपअधिक्षक भूमी अभिलेख व्ही. ए सवडतकर, भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधिकारी हणमंत हब्बलकर, प्रकाशकुमार, निमतानदार व्ही. आर झनके, ए. आर सोनटक्के, छाननी लिपीक ए.एस जगदाळे, एस एम क्यावल, भूमापक डी. जी नंदरेकर आदी उपस्थित होते. ड्रोन सर्वेमुळे मिळकतीचे वाद मिळणार असून प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होणार आहे. सरकारी जागा गावात किती आहेत याची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच रस्ता समजणार असून रस्त्याचे वाद मिटणार आहे. या सर्वांमुळे अतिक्रमणाला आळा बसणार आहे. ***** नाताळ सण साधे पणाने साजरा करावा *जिल्हा प्रशासनाचे आवाहन *मार्गदर्शक सूचना जारी बुलडाणा, दि. 24 (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गानाचा नविन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण 25 डिसेंबर रोजी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. याबाबत शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्यसा आहेत. त्यानुसार ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के लोकांची उपस्थिती असण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये गर्दी होणार नाही व सामाजिक सुरक्षा अंतराचे पालन होईल याची काळजी घ्यावी. तसेच मास्क व सॅनीटायझरचा उपयोगावर विशेष लक्ष द्यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अश्या काही वस्तू ठेवल्या जातात. त्या पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणी देखील शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choirsters) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर अथवा परीसरात दुकाने लावू नये. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित करणारे कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तरी ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment