Monday 27 December 2021

DIO BULDANA NEWS 27.12.2021

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख यांना अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांना 27 डिसेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व अन्य कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ********* शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता मिळणार 50 टक्के अनुदान · उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान · जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : सन 2011-22 या वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी दिली आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत शेळी, मेंढी, कुक्कुट व वराह पालनाकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादनकरीता सुद्धा 50 टक्के अनुदान मिळणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी – मेंढी पालनाकरीता 50 लक्ष रूपये, कुक्कुट पालनाकरीता 25 लक्ष रूपये, वराह पालनाकरीता 30 लक्ष रूपये आणि पशुखाद्य, वैरण विकासासाठी 50 लक्ष रूपये आहे. प्रकल्पाकरीता स्वहिस्स्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. सदर योजनेचा लाभ व्यक्तीगत, व्यावसायिक, स्वयं सहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेली कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सह जोखिम गट, सहकारी संस्था, स्टार्टअप ग्रुप आदी घेवू शकणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल, पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा, छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक आदी ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in यावर उपलब्ध आहे. योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तरी सदर योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए बी लोणे यांनी केले आहे. ****** उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर • जानेवारी ते जुलै 2022 दरम्यानचा कार्यक्रम बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : माहे जानेवारी ते जुलै 2022 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – जानेवारी 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 जानेवारी, शेगाव 5 व 24, मेहकर 7 व 17 , खामगांव 10 व 28, चिखली 14, नांदुरा 20, मलकापूर 11 व 25, सिंदखेड राजा 21, लोणार 19 व देऊळगाव राजा येथे 17 जानेवारी रोजी होणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 फेब्रुवारी, शेगाव 4 व 23, मेहकर 7 व 25, खामगांव 9 व 28, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 11 व 24, सिंदखेड राजा 22, लोणार 18 व देऊळगाव राजा 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मार्च 2022 मध्ये : जळगाव जामोद 2 मार्च, शेगाव 4 व 23, मेहकर 7 व 28, खामगांव 9 व 30, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 11 व 25, सिंदखेड राजा 22, लोणार 17 व देऊळगाव राजा 16 मार्च रोजी होणार आहे. एप्रिल 2022 मध्ये : जळगाव जामोद 4 एप्रिल, शेगाव 6 व 26, मेहकर 7 व 27, खामगांव 8 व 29, चिखली 13, नांदुरा 21, मलकापूर 11 व 25, सिंदखेड राजा 22, लोणार 19 व देऊळगाव राजा 18 एप्रिल रोजी होणार आहे. मे 2022 मध्ये : जळगाव जामोद 4 मे, शेगाव 6 व 26, मेहकर 9 व 27, खामगांव 11 व 30, चिखली 17, नांदुरा 20, मलकापूर 13 व 25, सिंदखेड राजा 23, लोणार 19 व देऊळगाव राजा 18 मे रोजी होणार आहे. जुन 2022 मध्ये : जळगाव जामोद 3 जुन, शेगाव 6 व 27, मेहकर 8 व 28, खामगांव 10 व 30, चिखली 15, नांदुरा 22, मलकापूर 13 व 24, सिंदखेड राजा 23, लोणार 20 व देऊळगाव राजा 17 मे रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या शिबिराच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी शिबीर कार्यालय घेण्यात येणार आहे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment