Friday 10 December 2021

DIO BULDANA NEWS 10.12.2021

 गोदाम बाधकाम, बीज प्रक्रिया संच या घटकासाठी अर्ज घेण्यास सुरूवात

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत फ्लेक्झी घटक अंतर्गत अर्ज

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत फ्लेक्झी घटकाअंतर्गत गोदाम बाधकाम, बीज प्रक्रिया संच या बाबींसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी उत्पादक गट यांचाकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय तथा उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत. गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया संच या बाबीचा लाभ हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी उत्पादक गट असणाऱ्यांना आहे.

    त्यासाठी अर्ज हा 20 डिसेंबर 2021 पर्यंत करावयाचा आहे. विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी उत्पादक गट यांचाच विचार केला जाईल. जिल्ह्यास गोदाम बांधकाम 3, बीज प्रक्रिया संच- 1 असा लक्षांक प्राप्त आहे. सदर लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची स्थानिकरित्या सोडत काढण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये योजनेअंतर्गत 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम साठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना तथा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी सदर लाभास पात्र राहील. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान अदायगी होईल.

  तसेच बीज प्रक्रिया संच योजनेअंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांना बीज प्रक्रिया संच उभारणी करण्यासाठी (यंत्रसामुग्री व बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी) बँकेकडे प्रकल्प सादर करावा.   बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी सदर लाभास पात्र राहील. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बीज प्रक्रिया संच उभारणी पूर्ण झाल्यावर अनुदान अदायगी होईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        **********


पीसीपीएनडीटी अंतर्गत खबऱ्या बक्षीस योजनेबबत कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : जिल्हा सामान्य रूग्णालय येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच कायद्या अंतर्गत खबऱ्या योजना याबाबत जनजागृती करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 7 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. वंदना काकडे व प्रा. डॉ. अस्मिता मनवर उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष डॉ. भुसारी म्हणाले, जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्व स्तरातून पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य सेवेतील आशा वर्कर अंगणवाडी सेविका त्यांचा सहभाग महत्वाचा आहे.

   तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनीसुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. काकडे व डॉ. मनवर यांची आपल्या मनोगतातून महिलांचे सामाजिक स्थान व संस्कारक्षम पिढी तयार करण्यासाठी महिलांचे योगदानावर चर्चा केली.  सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पडघान यांनी शासनाच्या खबऱ्या योजेनची माहिती दिली. तक्रारीबाबत टोल फ्री क्रमांक व संकेतस्थळाबाबतही माहिती दिली. कार्यक्रमाला डॉ. भराड, डॉ. अर्चना वानेरे, डॉ. अस्मिता चिंचोले, डॉ. चाटे, डॉ. काळे, डॉ. टाले, सहायक सरकारी वकील ॲड सोनाली सावजी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पीसीपीएनडीटी विभागाचे वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड वंदाना काकडे, श्री. जोशी, श्री. भोंडे व इतर रूग्णालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचलन श्री. सोळंकी यांनी तर आभार प्रमोद टाले यांनी मानले.

                                                                                    *********

नांदुरा वसतिगृहात महापरिनिर्वाणा दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : नांदुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गृहपाल एस व्ही सोनटक्के, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी गृहपाल श्री. सोनटक्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थी प्रीतम वाघ, अंकीत वाघ, अभिषेक तायडे यांनीसुद्धा यावेळी आपले विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन अक्षय इंगळे याने केले.

********

 


विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीसाठी

जिल्ह्यात 97.82 टक्के मतदान

• मतदान सर्वत्र शांततेत

• 11 मतदान केंद्रांवर मतदान

• 359 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : विधानपरिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या  निवडणूकीकरीता आज 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. मतदान सर्वत्र शांततेत झाले. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 11 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावरती आज सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण स्थानिक प्राधिकारी पुरूष मतदार 169  व स्त्री मतदार 198 आहेत. एकूण मतदार जिल्ह्यात 367 आहेत. त्यापैकी 165 पुरूष मतदारांनी, तर 194 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. अशाप्रकारे एकूण 359 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची टक्केवारी 97.82 आहे.तसेच जिल्ह्यात निवडणूकीसाठी एकूण मतदार 367 आहेत. मतदान केंद्र निहाय मतदार संख्या : बुलडाणा – पुरूष 40, स्त्री 62 एकूण 102, चिखली : पुरूष 16, स्त्री 14 एकूण 30, दे. राजा : पुरूष 9, स्त्री 12, एकूण 21, सिं. राजा : पुरूष 10, स्त्री 9 एकूण 19, लोणार : पुरूष 7, स्त्री 13 एकूण 20, मेहकर : पुरूष 14 व स्त्री 13, एकूण 27, खामगांव : पुरूष 18 व स्त्री 19, एकूण 37, शेगांव : पुरूष 15 व स्त्री 17, एकूण 32, जळगांव जामोद : पुरूष 11 व स्त्री 10, एकूण 21, नांदुरा : पुरूष 11 व स्त्री 15, एकूण 26, मलकापूर : पुरूष 18 व स्त्री 14, एकूण 32.

   जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण केंद्र, मतदान केलेले पुरूष व स्त्री मतदार : मलकापूर – तहसील कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 15, स्त्री 12, एकूण 27, जळगांव जामोद – तहसील कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 11, स्त्री 10, एकूण 21, शेगांव – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 14, स्त्री 16, एकूण 30, नांदुरा – पंचायत समिती, पुरूष 11, स्त्री 15, एकूण 26, बुलडाणा – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 40, स्त्री 61 व एकूण 101, खामगांव – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 18, स्त्री 19, एकूण 37, चिखली – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 16, स्त्री 14, एकूण 30, मेहकर – पंचायत समिती, पुरूष 14, स्त्री 13 व एकूण 27, दे. राजा – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 9, स्त्री 12, एकूण 21, सिं. राजा – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 10, स्त्री 9 व एकूण 19, लोणार – तहसिल कार्यालय मतदान केंद्र, पुरूष 7, स्त्री 13 व एकूण 20 मतदार आहेत.

                                                                                    *****

माजी सैनिकांच्या मेळाव्याचे 16 डिसेंबर रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.10 : ध्वजदिन निधी संकलन समारोह तथा माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सैनिक कॉम्प्लेक्स, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित राहणार आहे. मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अवलंबित यांनी उपस्थित रहावे. कार्यक्रमास येताना मास्क लावणे अनिवार्य आहे. तसेच कार्यक्रमासाठी लसीचे दोन डोस घेतलेले असलेल्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. तरी माजी सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.

                                                                                ******

No comments:

Post a Comment