DIO BULDANA NEWS 29.05.2024

वाळूसाठे शोधण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील *नांदुरा तालुक्यात 1775 ब्रास वाळू जप्त *सिंदखेडराजा, खामगावात टिप्परवर कारवाई बुलडाणा, दि. 29 : अवैध वाळूबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आठवडाभरापासून कार्यवाही करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात येत आहे. या वाळूसाठ्याचा शोध ड्रोन सर्व्हेक्षणाने घेण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात आढळणारा वाळूसाठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वाळूसाठा निदर्शनास येऊनही कारवाई केली नसल्यास संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. मलकापूर, नांदुरा, मेहकर आणि संग्रामपूर तालुक्यात वाळूसाठे आणि वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे 1775 ब्रास वाळू साठे जप्त केले. मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात अपर तहसिलदार आणि कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात बेलाड गट नं. 224 येथे 354 ब्रास, बेलाड गट नं. 5 येथे 324 ब्रास, बेलाड गट नं. 19 येथे 103 ब्रास, येरळी गट...