Posts

Showing posts from January, 2025

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागामार्फत राज्य युवा पुरस् ‍ कार सन 2023-24 या वर्षाकरीता नामांकने मागविण्यात आले आहे. अर्हता धारण करणाऱ्या युवक, युवती व संस्थांनी आपले नामांकन अर्ज, प्रस्ताव दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन , जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.   राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार देण्यात येतात.   सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था याना देण्यात येणार आ...

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी   नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन     बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.   या कुंभमेळ्यातील आपत्कालीन स्थितीत प्रयागराज कंट्रोल रुम टोल फ्री क्रमांक 1920, दुरध्वनी क्रमांक 0522-2237515 उपलब्ध केला आहे. तसेच मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्या संपर्क क्रमांक 022-22027990 असा आहे. त्यासोबतच अमरावतीचे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 0721-2661364 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यासह जिल्हा पोलीस नियत्रंण कक्षाने. 07262-242400 तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक 07262-242683 हा उपलब्ध केला ...

शेतकऱ्यांनो, ई-नाम प्रणालीव्दारे शेतमालाची विक्री करा

  शेतकऱ्यांनो, ई-नाम प्रणालीव्दारे शेतमालाची विक्री करा ·         30 हजार शेतकऱ्यांची नोंदणी ·         35 लाख क्विंटल शेतमालाच्या विक्री ·         1300 कोटी रुपयांची उलाढाल   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:     कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक व शेतकरी हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ई-नाम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीने शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून आतापर्यंत सुमारे 30 हजार शेतकऱ्यांनी ई-नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. वर्षाअखेर जवळजवळ 35 लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे 1300 कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव व बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्...

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

  डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारी उपस्थित राहण्याचे आवाहन   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.   थेट अभिकर्तासाठी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधीक्षक बुलडाणा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. एजंट भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवानिवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे.   निवड झालेल्या उ...

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

Image
  रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   राज्य शासनाच्यावतीने दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा महिना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नेहरु युवा केंद्रामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत दि. 17 ते 23 जानेवारी दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले असून रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, ‍निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनाचे ‍जिल्हा समन्वयक डॉ. हनुमंत भोसले, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी व रासेयो कार्यक्रम अधिकारी पवन जगताप, जिजामाता महाविद्यालय एनसीसीचे लेफ्टनंट पवन ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे, नेहरु युवा केंद्राचे सेवानिवृत्त सहाय्यक धनंजय चाफेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे...

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर

  जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांची मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले आहे.             सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये स्तनाचा कर्करोग, स्त्री गर्भाशय कर्करोग, मुख कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असून कर्करोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञव्दारे तपासणी केली जाणार आहे. तरी या शिबीराचा लाभ घ्यावा. 0000

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
  जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राव्दारे दि. 26 जानेवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध स्पर्धेत सहभागी विजेता खेडाळूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.                 स्पर्धेच्या सुरुवातीला बुलढाणा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आले. 100 मी धावणे स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक किशोर बरेडे,   व्दितीय क्रमांक सचिन घोती, तृतीय क्रमांक संकेत वायाळ तर मुलींमध्ये   प्रथम जान्हवी खरात, व्दितीय क्रमांक नेहा जाधव, तृतीय क्रमांक विजयालक्ष्मी वारंगाणे यांनी पटकविला. गोळाफेक या खेळात मुलांमध्ये प्रथम क्रमांक सागर पाटील, व्दितीय क्रमांक सागर बोर्डे, तृतीय क्रमांक तिलक तोंडीलायता यांनी तर मुलींमध्ये प्रथम नेहा जाधव, व्दितीय क्रमांक वैष्णवी निकाळजे, तृतीय क्रमांक मिरा टेकाळे यांनी पटकविला. खो-खो या खेळात प्रथम क्र...

3 फेब्रुवारीला लोकशाही दिन

  3 फेब्रुवारीला लोकशाही दिन   बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी   लोकशाही दिन   आयोजित करण्यात येतो. त्यानुसार फेब्रुवारी   महिन्याचा   लोकशाही दिन   सोमवार, दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.   लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने   लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी   कळविले आहे. 00000000

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न

Image
  जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न     बुलढाणा,दि.30(जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त   विद्यमाने जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा शारदा ज्ञानपीठ विद्यालय बुलढाणा येथे दि.26 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते.   यावेळी विजेता खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.   जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये 10 संघानी सहभागी झाले होते. सामने साखळी बाद पध्दतीने खेळविले गेले. वयोगट 13 वर्षा आतील मुलांसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये एकूण 21 सामने खेळविण्यात आले. प्रत्येक सामन्यामधून उत्कृष्ठ खेळाडूंचे पारीतोषिक देण्यात आले. प्रथम चार संघाना   चषक व रोख पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये मलकापूर संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. शारदा ज्ञानपीठ विद्यालयाने द्वितीय क्रमांक तर शारदा ज्ञानपीठ संघ “ ब ” , बुलढाणा यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. पोदार इंटरनॅशल स्कूल, बुलढाणा यांनी च...

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;

  अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण; हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन   बुलढाणा,दि.30(जिमाका) : अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यावसाय चालकांसाठी फोस्टेक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.   सदर प्रशिक्षण मोफत असून मे. नर्मदा हॉटेल, चिखली रोड, बुलढाणा येथे होणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग अन्न व्यवसाय चालकांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी केले आहे. फोस्टेक प्रशिक्षण हा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा उपक्रम असून भारत सरकार आणि अन्न सुरक्षा आयुक्त यांचे निर्देशानुसार घेण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, आणि केटरिंग व्यावसाय चालवण्याऱ्यांसाठी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून केवळ अन्न सुरक्षा सुनिश्चित होत नाही, तर व्यावसायाची विश्वासार्हत आणि गुणवत्ता देखील वाढते. प्रशिक्षणाचा उद्देश अन्न सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत जागरुकता निर्माण करणे व अन्न व्य...

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे

Image
  शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे   * जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती *   जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन   बुलडाणा, (जिमाका) दि. 30:   राज्य शासनाच्यावतीने दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा महिना राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने बुलढाण्यातील पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन केले.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. विश्व पानसरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागनाथ महाजन, पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष दिपक लध्दड कार्यक्रामास उपस्थित होते.   यावेळी उपस्थित मान्यव...

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम योजनेअंतर्गत सहभागी करून घ्या;

Image
  बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम योजनेअंतर्गत सहभागी करून घ्या ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे संबंधित विभागाला निर्देश   बुलडाणा, (जिमाका) दि. 30:   पीएम कुसुम योजनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्या, असे   निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रशासनाला दिलेत.     बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज 30 जानेवारीला पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत संबंधित यंत्रणेला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्देश दिले. यावेळी केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, श्वेता महाले, मनोज कायदे, सिद्धार्थ खरात तसेच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.     बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाध...

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

Image
  नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक * जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी * अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी * आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी   बुलढाणा,दि.30(जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने सन २०२५-२६ या नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४००.७८ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना घटक कार्यक्रमाअंतर्गत १०० कोटी व आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत १८.६५ कोटी अशा एकूण ५१९. ४३ कोटींचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.   निवडणुकीनंतर जिल्ह्याची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, सर्वश्री आमदार चैनसुख संचेती,...