DIO BULDANA NEWS 31.10.2022
.jpg)
सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन बुलडाणा, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हानिवडणूक अधिकारी गौरी सावंत, तहसीलदार शामला खोत, प्रिया सुळे, पुष्पा डाबेराव, नायब तहलिदार संजय बंगाळे, श्री. नाईक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. 00000 राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकता दौड संपन्न बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र आणि जिजामाता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आण...