DIO BULDANA NEWS 31.12.2021
उ त्पादन शुल्क विभागाचा कारवाईचा धडाका सुरूच डिसेंबर महिन्यात 93 गुन्हे नोंदवित 94 आरोपींना अटक 34 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 93 गुन्हे नोंदविण्यात आले असून 87 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे नोंदवुन 94 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 10 वाहनांसह एकुण 34 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस डी चव्हाण यांचे पथकाने शेंदला, ता. मेहकर येथील आरोपी इसम नामे संतोष सरदार यांचे राहते घरी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला. त्याठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू ब्ल्यु 7 एक्स्ट्रा स्मुथ व्हिस्की या ब्रँण्डच्या 750 मिलीच्या 36 बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक 1 व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध...