Sunday 9 August 2020

DIO BULDANA NEWS 9.8.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 330 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 67 पॉझिटिव्ह

• 35 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.9: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 397 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 330 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 67 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 41 व रॅपिड टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 144 तर रॅपिड टेस्टमधील 186 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 330 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली : 2, संभाजी नगर 1, सातगांव म्हसला ता. बुलडाणा : 2, मलकापूर : 1, आनंद सोसायटी 2, मोताळा : 1, गोतमारा ता. मोताळा : 2,  लोणार : 4, दहीफळ ता. लोणार : 1, बानापूर ता. लोणार : 2, खळेगांव ता. लोणार : 2, सुलतानपूर ता. लोणार : 4, नांदुरा : संभाजी नगर 2, महाराणा चौक 2, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, जयपूर लांडे ता. खामगांव : 1,  खामगांव : चांदमारी 1, वामन नगर 2, जानकी कॉम्प्लेक्स 1, सुटाळा 2, जुना फैल 1, बाळापूर फैल 1, शिक्षक कॉलनी 3, पोलीस वसाहत 5, शंकर नगर 1, आठवडी बाजार 1, दे. राजा : बालाजी मंदीराजवळ 2, खाकपुरा 1, बायगांव ता. दे. राजा : 4, मेहकर : 3, विठ्ठल मंदीराजवळ 1, स्टेट बँके जवळ 1,  आडोळ ता. जळगांव जामोद : 1, पळसखेड ता. जळगांव जामोद : 1, बुलडाणा : सुवर्ण नगर 1, साईनगर सागवण 1,शेगांव : 1, तीन पुतळाजवळ 1, शेलू ता. सिं. राजा : 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 67  रूग्ण आढळले आहे.
      तसेच आज 35 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मेहकर : 9, बालाजी नगर 1,  डोणगांव ता. मेहकर : 2, घाटबोरी ता. मेहकर : 1, खामगांव : 2, सती फैल 3, आठवडी बाजार 1, वाडी 6, सिंधी कॉलनी 5, नवा फैल 4  येळगांव ता. बुलडाणा : 1.  
   तसेच आजपर्यंत 12320 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1160 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1160 आहे.  
  आज रोजी 171 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 12320 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1907 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1160 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 712 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******


आदिवासी समाज बांधवांच्या समस्या सोडविणार

 - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

*आदिवासी बहुल भिंगारा गावात विश्व आदिवासी दिवस साजरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 - जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. या समाज बांधवांच्या प्रलंबित असलेले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,  असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.  जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथे  विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधीत करताना पालकमंत्री  बोलत होते.

     आज 9 ऑगस्ट आहे.  हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र द्वारा घोषित करण्यात आला आहे. हा दिवस जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत अतिशय दुर्गम भागात वसलेल्या भिंगारा या गावात भिलाला, बारेला, पावजाती भिंलारा या आदिवासी जमतीकडून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून या समाजाच्या वतीने दरवर्षी विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने कोरोना सुरक्षेचे नियम पाळून सामाजिक अंतर राखत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ राजेंद्रजी शिंगणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, भीमराव पाटील, डॉ दाभाडे  होते.

   पालकमंत्री पुढे म्हणाले, याठिकाणी असलेल्या आदिवासी समाजाचे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे. यामध्ये प्रामुख्याने जमिनीचे पट्टे वाटप असेल, जात प्रमाणपत्राचा विषय असेल किंवा सर्वात महत्वाचा येथे राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधा अशा सर्व प्रश्नांकरिता लवकरच संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

  कार्यक्रमाला पंचक्रोशीतील आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाला आदिवासी बांधवाकडून सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले.

                                                                                                                                ************


--

No comments:

Post a Comment