Monday 3 August 2020

DIO BULDANA NEWS 3.8.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 439 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 88 पॉझिटिव्ह • 35 रूग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि.3: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 527 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 439 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 88 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 57 व रॅपिड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 116 तर रॅपिड टेस्टमधील 323 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 439 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा :1 पुरूष, सरस्वती नगर 1 महिला, 1 पुरूष, लांडे ले आऊट 1 पुरूष, बाजार समिती परिसर 1 महिला, 1 पुरूष, सुवर्ण नगर 1 पुरूष, संगम चौक परिसर 1 महिला, भीमनगर 1 पुरूष, जिजामाता नगर 1 पुरूष, दत्तपूर ता. बुलडाणा : 1 पुरूष, चिखली : 2 पुरूष, 1 महिला, जाफ्राबाद रोड 2 महिला, 1 पुरूष, सुलतानपूर ता. लोणार : 1 महिला, मोताळा : 1 पुरूष, 1 महिला, मलकापूर : 1 महिला, भोगावती ता. चिखली : 2 महिला, दाताळा ता. मलकापूर : 2 पुरूष, 2 महिला, नांदुरा : जामा मस्जिदजवळ 2 महिला, 1 पुरूष, विठ्ठल मंदीराजवळ 7 महिला, 1 पुरूष, मिलींद नगर 2 पुरूष, 1 महिला, डवंगेपुरा 1 पुरूष, राम मंदीराजवळ 2 महिला, 1 पुरूष, वसाडी बु ता. नांदुरा : 1 महिला, खामगांव : 2 पुरूष, डि.पी रोड 1 महिला, सती फैल 5 महिला, आठवडी बाजार 2 पुरूष, वाडी 2 महिला, 1 पुरूष, शेगांव : पोलीस स्टेशन 1 पुरूष, माटरगांव ता. शेगांव : 5 पुरूष, 3 महिला, दे. राजा : 1 महिला, 1 पुरूष, मस्जिदपुरा 1 पुरूष, अहिंसा नगर 1 पुरूष, बोराखेडी ता. दे. राजा : 3 पुरूष, 4 महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 3 पुरूष, लोणार : 1 पुरूष, बावनबीर ता. संग्रामपूर : 2 पुरूष, 1 महिला, खरबडी ता. मोताळा : 1 पुरूष, 1 महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 88 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 35 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 1 महिला, राऊतवाडी 1 पुरूष, दे. राजा : चांदेश्वरी मंदीराजवळ 1 महिला, 1 पुरूष, शेगांव : बालाजी फैल 3 पुरूष, 4 महिला, पहुरजिरा ता. शेगांव : 1 महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 1 महिला, अंचरवाडी ता. चिखली : 5 पुरूष, 5 महिला, नांदुरा : कृष्णा नगर 1 पुरूष, मारवाडी गल्ली 1 पुरूष, नांदुरा खुर्द 2 पुरूष, 1 महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2 पुरूष, बेलाड ता. नांदुरा : 1 महिला, खामगांव : जुना धान्य बाजार परिसर 1 पुरूष, जळगांव जामोद : चौबारा 1 पुरूष, जनुना ता. खामगांव : 1 पुरूष, केशव नगर 1 पुरूष, तसेच आजपर्यंत 9968 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 887 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 887 आहे. आज रोजी 82 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 9968 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1487 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 887 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 570 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 30 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ************** क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन बुलडाणा,(जिमाका) दि.3: थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमीत्ताने आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ आर. जी पुरी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. **************

No comments:

Post a Comment