Wednesday 12 August 2020

DIO BULDANA NEWS 12.8.2020

 आठवडी बाजारच्या दिवशी संचारबंदी; मात्र दुकाने सुरळीत सुरू राहणार

       बुलडाणा,(जिमाका) दि.12 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत करावयाच्या उपय योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने 21 जुलै 2020 चे आदेशानुसार आठवडी बाजार असणाऱ्या गावात, शहरात त्या दिवशी आठवडी बाजार रद्द करून कडक संचारबंदी लागू केली होती. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आठवडी बाजार शुक्रवार व सोमवारी भरतात. तसेच शनिवार व रविवार दिवशी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी नागरिकांना जिवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी अडचण येत आहेत.

    संचारबंदीचे दिवस झाल्यानंतर दुसरे दिवशी बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ज्या गावात, शहरात आठवडी बाजार भरतात, त्यास बंदी राहणार आहे. तसेच आठवडी बाजाराचे क्षेत्रात सदर दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे. मात्र संबंधीत गावातील, शहरातील इतरही दिवशी सामान्यपणे उघडी असणारी दुकाने त्याचप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 236 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 30 पॉझिटिव्ह

  • 42 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 266 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 236 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 120 तर रॅपिड टेस्टमधील 116 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 236 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 1,  आनंद नगर 1, लहाने ले आऊट 1, गजानन नगर 1, इकबाल नगर 3, शेगांव : सुरभी कॉलनी 1, आदर्श नगर 1, हाय फाय कॉलनी 1, भुत बंगला जवळ 1,  सुलतानपूर ता. लोणार : 1, जयपूर लांडे ता. खामगांव : 1, दे. राजा : संजय नगर 5, शिंदी हराळी ता. चिखली : 1, मलकापूर : 1, बिबी ता. लोणार : 1, अंत्री खेडेकर ता. चिखली : 4, नांदुरा : शिवाजी नगर 1, खामगांव : घाटपुरी नाका 1, विठ्ठल नगर 1, वाडी 1, माफरीया नगर 1       संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 30  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे कुंभारवाडा खामगांव येथील एका 85 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बावनबीर ता. संग्रामपूर :2, वरवट बकाल ता. संग्रामपूर :1, बुलडाणा :1, संगम चौक 1, परदेशीपुरा 1,  शेगांव : पोलीस स्टेशन 1, दे. राजा : 2, मस्जीदपुरा 1, साखरखेर्डा ता. सिं.राजा : 4, बोराखेडी बावरा ता. दे.राजा : 7,  लोणार : 1, खामगांव : 1, इंदिरा नगर 2, शुक्ला ले आऊट सुटाळा 4, सुटाळा 2,  मलकापूर : 1, नांदुरा : सिंधी कॅम्प 2, डवंगेपुरा 1, आठवडी बाजार 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, मिलींद नगर 2, आयटीआय जवळ 1, गोतमारा ता. मोताळा : 1.

   तसेच आजपर्यंत 13013 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1232 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1232 आहे. 

  आज रोजी 70 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13013 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2029 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1232 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 761 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 36 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************

जिल्ह्यात आता रविवारलाच संचारबंदी

       बुलडाणा,(जिमाका) दि.12 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत करावयाच्या उपाय योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने 21 जुलै 2020 चे आदेशानुसार 21 ऑगस्ट 2020 पर्यंत जिल्ह्यात शनिवार व रविवार दिवशी संपूर्ण संचारबंदी लागू केली होती. मात्र शनिवार व रविवार दोन्ही दिवस संचारबंदी असल्यामुळे शुक्रवारी तसेच सोमवारी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता तसेच सदर रोगाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून 21 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक शनिवारी लागू असलेली संचारबंदी हटविण्यात येत आहे. आता केवळ प्रत्येक रविवार रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू राहणार आहे.

  या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंड संहीता च्या कलम 188 नुसार, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत दंडास पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

No comments:

Post a Comment