DIO BULDANA NEWS 8.8.2020


भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत
 पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द 
बुलडाणा, (जिमाका) दि.8 – भारत स्काऊट / गाईड बुलडाणा जिल्हा संस्थेच्यावतीने कोविड 19 साथरोगाविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 42 हजार 374 रूपयांची आर्थिक मदत दिली. या मदतीचा धनादेश आज संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंगणे यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी स्काऊट/ गाईड चे मुख्य आयुक्त डॉ. पी. एस वायाळ, गाईड आयुक्त सौ स्नेहलता मानकर, संस्थेचे सचिव आर. शिंगणे, पदाधिकारी प्रविण टेंभरे, सौ. वैशाली हिंगे, सुभाष आठवले, डॉ. नरवाडे, योगेश वायाळ, प्रशिक्षण उपायुक्त श्री. शिंबरे, कर्मचारी सुधाकर साखरे, किरण लहाने आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. 
 *************
 

कोविड रूग्णालयाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी 
 लोकार्पण कार्यक्रम तयारीचा घेतला आढावा 
बुलडाणा, (जिमाका) दि.8 – स्थानिक 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयाचे डेडीकेटेड कोविड रूग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. या रूग्णालयाचे अद्ययावतीकरणाचे काम टाटा ट्रस्टकडून करण्यात येत आहे. रूग्णालयाचे अद्ययावतीकरण अंतिम टप्प्यात असून या कामाची पाहणी आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी त्यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, निर्माण केलेल्या पायाभूत सोयी सुविधा, आयसीयु आदींची पाहणी केली. तसेच रूग्णालयाचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी होणाऱ्या ई लोकार्पण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ प्रेमचंद पंडीत, सार्व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, मुख्याधिकारी श्री. वाघमोडे आदींसह डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे आज दे. राजा येथील कोविड केअर हॉस्पीटलची पाहणीही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केली. या रूग्णालयाचे ई लोकार्पणही करण्यात येणार आहे. या रूग्णालयाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा व सुविधांचा आढवाही पालकमंत्री यांनी घेतला. याप्रसंगी संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ************* --

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या