Friday 7 August 2020

DIO BULDANA NEWS 7.8.2020

जिल्ह्यात 282 शेतकऱ्यांकडे रेशीम विकास प्रकल्प..! कोविड – 19 च्या काळात शेतकऱ्यांसाठी उत्तम उद्योग मनरेगातंर्गत कृती आराखड्यात ग्रामसभांनी रेशीम विकास प्रकल्पाचा ठराव घ्यावा बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यात सन 2015-16 पासुन सहकार व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालय नागपुर मार्फत रेशीम विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने राबविण्यात येत असून शेतकऱ्यांसाठी शेतीपुरक व्यवसाय अशी या उद्योगाची ओळख आहे. जिल्ह्यात 282 शेतकऱ्यांकडे रेशीम विकास प्रकल्प राबविला जात आहे. कोवीड -19 महामारीच्या काळात शेतकऱ्यांना कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी हा उत्तम उद्योग आहे. मनरेगाच्या चालु आर्थिक वर्षात रेशीम विकास प्रकल्प अंतर्गत शेतकरी तुती लागवड क्षेत्रात रेशीम किटक संगोपन घेत आहेत. सध्या रेशीम कोषाला 180 ते 200 रूपये प्रती कि.ग्रॅ. जालना, बारामती, पुर्णा, पाचोड या कोष बाजारपेठेत भाव मिळत आहे. परंतु मनरेगा अंतर्गत केलेल्या कामाची मजुरी शेतकऱ्यांना मिळत असल्याने कोष विक्री पासून मिळणारी रक्कम ही निव्वळ नफा आहे. एक एकर तुती लागवड क्षेत्रात 250 अंडीपुंजाचे संगोपन केले जाते. त्यापासुन 150 ते 175 कि. ग्रॅ. कोष उत्पादन एक महिन्यात होते. सध्याच्या कमीत कमी दर 180 रूपये प्रति किलो गृहीत धरला तर रुपये 27,000 ते 31,500 पर्यत उत्पन्न मिळू शकते. अशा प्रकारे माहे मार्च अखेर पर्यत 4 ते 5 पिके होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति एकरी 1 ते 1.50 लक्ष उत्पन्न मिळते. सध्या कोवीड -19 मुळे बाहेर फिरण्यास मनाई आहे. त्यामुळे अन्य पिके किंवा बाहेरील उद्योगात लक्ष घालण्यापेक्षा आपल्या शेतात रेशीम संगोपन घेतले तर शेतकऱ्यांना एका महिन्यात सरासरी 30 हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. सध्या खरीपातील पिके सोयाबीन, कापुस, तूर यापासून उत्पन्न मिळण्यासाठी 2 ते 3 महिने अवकाश आहे. मात्र रेशीम उद्योगाचे एक पीक हातात घेऊन 30 हजार रूपये कुटूंब चालविण्यासाठी आर्थिक मदत होवू शकते. ज्या शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचा आहे. त्यांनी त्यांचे ग्रामपंचायतकडे अर्ज देऊन ग्राम सभेमध्ये ठराव पारीत करुन घ्यावयाचा आहे. सन 2021-22 चा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कृती आराखडा पुढील महिन्यात सादर करावयाचा आहे. त्यासाठी लाभार्थी यादीसह कृती आराखडयात ग्रामस्तरावरील, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, यांनी रेशीम विकास प्रकल्पासाठी ठराव घेऊन त्याची प्रत रेशीम विकास अधिकारी व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना द्यावी. तरी उत्सुक शेतकरी बंधूंनी याचा लाभ घ्यावा. रेशीम विकास प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, मुठ्ठे ले आऊट, धाड रोड, भोंडे हॉस्पीटल जवळ, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे. मनरेगा अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्यासाठी मिळणारे अनुदान तुती लागवड जोपासना मिळणारी मजुरी रक्कम : पहिले वर्षासाठी 67,116 रूपये, दुसरे वर्षासाठी 47,600 रुपये, तिसरे वर्षाकरीता 47,600 रुपये, एकूण रुपये 1,62,316 रूपये. संगोपन साहित्यासाठी मिळणारी रक्कम : पहिले वर्ष 41,160 /- दुसरे वर्ष 10,285 रुपये, तिसरे वर्ष 10,285 रूपये, एकूण रुपये 61,730 रूपये . रेशीम किटक संगोपन गृह साहित्यासाठी मिळणारी रक्कम : पहिले वर्ष 49,050 रूपये, एकूण रुपये 49,050 रूपये. रेशीम किटक संगोपन गृह बांधकामसाठी मिळणारी मजुरी रक्कम : पहिले वर्ष 50,694 एकूण रुपये 50,694 रूपये असे एकूण रक्कम पहिले वर्ष 2, 08, 020 रुपये, दुसरे वर्ष 57,885 रुपये, तिसरे वर्ष 57,885 रुपये, एकूण रुपये 3,23, 790 रूपये अनुदान स्वरूपात मिळतात. ******* कोरोना अलर्ट : प्राप्त 445 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 81 पॉझिटिव्ह 29 कोरोना बाधीत रूग्णांना सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 526 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 445 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 81 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 59 व रॅपिड टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 324 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 445 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर : 5, चिखली : 4, नांदुरा : 2, शेगांव : 1, पटवारी कॉलनी 3, गांधी चौक 1, ब्राम्हणपूरा 2, माळीपूरा 1, ओम नगर 3, भैरव चौक 2, लखपती गल्ली 2, खामगांव : 2, आठवडी बाजार 4, केशव नगर 2, सुटाळा 4, रेणुका माता नगर 1, शिवाजी वेस 5, बाळापूर फैल 2, जुना फैल 2, शंकर नगर 1, रॅलीस प्लॉट 1, जोशी नगर 1, पोलीस वसाहत 2, सती फैल 1, तलाव रोड 2, अमडापूर ता. चिखली 1, नेपाणा ता. खामगांव : 1, धाड ता. बुलडाणा : सराफा लाईन 2, बुलडाणा : 2, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, दे.राजा : 1, खळेगांव ता. लोणार : 1, सुलतानपूर ता. लोणार : 4, सि. राजा : 1, मेहकर : 6, जानेफळ ता. मेहकर : 1, घाटबोरी ता. मेहकर : 1, भेंडवळ ता. जळगांव जामोद : 1,डोंगरशेवली ता. चिखली : 1, मूळ पत्ता नागपूर असलेले : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 81 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मेहकर : रामनगर 1, शिवाजी नगर 1, लोणी गवळी ता. मेहकर : 10, डोणगांव ता. मेहकर : 7, लोणार : 4, खामगांव : आठवडी बाजार 4, केशव नगर 2. तसेच आजपर्यंत 11538 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1019 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1019 आहे. आज रोजी 202 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 11538 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1768 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1019 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 714 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ******* प्रवाशांनी एस टी सुविधेचा लाभ घ्यावा बुलडाणा,(जिमाका) दि.7 : कोविड 19 च्या संकटात जिल्हा अंतर्गत एसटी ची प्रवासी बस सुविधा सुरू झालेली आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. प्रवासा दरम्यान प्रवाशांनी मास्क चा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवून प्रवास करावा. प्रवाशांच्या विश्वासाचे एस .टी महामंडळाचा बुलडाणा विभाग आता सज्ज झाला असून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हती देत आहे. प्रवाशांमध्ये सामाजिक अंतर, बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. माहे जून 2020 मध्ये जे प्रवास भाडे होते. त्याच प्रवास भाडे दरामध्ये प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध आहे. प्रवासी वाहतूक एस. टी महामंडळामार्फत सुरक्षीत आहे. एस.टीतील आसन व्यवस्था सामाजिक अंतर राखून आहे, निर्जंतुकीकरण केलेल्या बसेस व माफक दरात प्रवास ही या सेवेची वैशिष्टये आहेत. अधिक माहितीसाठी विभागातील नियंत्रण कक्षाशी अथवा संबंधीत आगार व्यवस्थापकांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. हे आहेत संपर्क क्रमांक : बुलडाणा आगार – 07262 242788, चिखली : 07264- 242084, मेहकर : 07268- 224554, खामगांव : 07263- 252224, मलकापूर : 07267- 222170, जळगांव जामोद : 07266- 221453, शेगांव : 07265- 252028. ******

No comments:

Post a Comment