Monday 31 August 2020

DIO BULDANA NEWS 31.8.2020

 आदिवासी विदयार्थ्यांची एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुल प्रवेश परीक्षा रद्द

  • मागील सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :आदिवासी विदयार्थ्यांना एकलव्य रेसीडेन्शीयल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी ची परिक्षा

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. ही परिक्षा ऑनलाईन होणार होती; परंतु परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअकोला यांच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळाजिल्हा परिषदनगरपालीका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी, 6 वी, 7 वी, 8 वी  व 9 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विदयार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेतत्यांच्या मागील सत्रातील गुणाच्या आधारे विदयार्थ्यांची निवड होणार आहे.

   सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विदयार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरले आहे त्यांनी आता पाचव्या वर्गातील प्रथम सत्राचे गुणभरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहे. हाच निष्कष 7 वी, 8 वी व 9 वी रिक्त जागेवरील प्रवेशासाठीही लागु करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकदर 900 पैकी विदयार्थ्यांनी किती गुण मिळविले त्याआधारे निवड यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांच्या गुणाऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विदयार्थ्यांच्या अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला संपर्क/मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. विदयार्थ्याची जन्म तारीख

आवश्यक आहे. विदयार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन केलेली गुणपत्रेकेची प्रत png,jpeg,jpg,pdf  हया स्वरुपात असावी.) शाळेतील एकापेक्षा जास्त विदयार्थ्यांचे आवेदपत्र भरलेले असतीलतर प्रत्येक विदयार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करावे.

      आवेदनपत्र भरलेल्या सर्व विदयार्थ्यांनी किंवा संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लींकवर भरावयाचे आहे. त्याकरिता मुख्याध्यापक यांनी संबंधीत विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे गुण 900 पैकी गुण नोंदवायचे आहे. (मराठीइंग्रजीहिंदीगणितविज्ञानसमाजशास्त्रकलाक्रिडा व कार्यानुभव असे एकुण 9 विषय) वर्ग 1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्यांना देण्यात येणा-या प्रगती पुस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते. त्यामुळे सर्व संबंधीत विदयार्थ्यांचे त्यांच्या शाळेकडुन गुण प्राप्त करुन मुख्याध्यापकांनी लिंकमध्ये 15 सप्टेबर, 2020 पर्यत भरावयाचे आहेत, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळवीले आहे.                         

**********

       फिट इंडीया फ्रीडम रन मोहिमेला सुरुवात

  • राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम संपन्न

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :  क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठी यांचेहस्ते हारार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यालयातील क्रीडा अधिकारी आर.आर. धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळेविजय बोदडेसुरेशचंद्र मोरेविनोद गायकवाडकैलास डुडवाकृष्णा नरोटेगणेश डोंगरदिवे तसेच जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे कबड्डी/मैदानी/हॅण्डबॉलचे खेळाडू उपस्थित होते.

    याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्व.मेजर ध्यानचंद यांचे जिवनावर प्रकाश टाकुन माहिती दिली. तसेच क्रीडा दिनाचे औचित्य साधून फिट इंडीया फ्रीडम रन या मोहिमेचा प्रारंभ करुन ऑनलाईन विविध खेळ विषयक चर्चा सत्र सेमिनारचे आयेाजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व स्पोर्टस् झोन ऑफ मलकापुर मार्फत करण्यात आले. या चर्चा सत्रात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी टी.ए.सोर यांनी स्व.मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती विद केली. तसेच क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. नितीन बऱ्हाटे आरोग्य चिकीत्सक यांनी आरोग्य विषयक व डायट बद्दल माहिती दिली. तसेच चंद्रकांत साळुंके यांनी फिजीकल फिटनेस बद्दल माहिती दिली. सदर चर्चासत्र हे प्रा.नितीन भुजबळविजय पळसकर व स्पोर्टस् झोन ऑफ मलकापुरचे पदाधिकारी यांनी यशस्वी करण्यास मदत केली.

   तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा दिन बाबत व फिट इंडीया फ्रीडम रन मोहिमेबद्दल माहिती व दि.29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत  फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन ही चळवळ राबविण्यात येत आहे.  तुम्ही कोठेहीकधीही धावु / चालु शकता किंवा सायकलींग करु शकता या उपक्रमामागील संकल्पना आहे.  सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरुन सादर करावयाचा आहे.

  सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर www.fitindia.gov.in     https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfGpaDej3yOnzQk_0BlRbNSz48N3VtyJAbGOIxBwSV1T1R7Pg/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0  या ब्लॉगवर फॉर्म भरुन नोंदणी केल्याची नोंदीचा स्क्रीनशॉट dsportsbld@gmail.com या ई-मेल आयडीवर व 9970071172 या व्हाटस्अप मोबाईल नंबर वर अहवाल सादर करावा.  तसेच पुर्ण माहिती भरल्यानंतर आपणास ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

   तरी वरीलप्रमाणे फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थाशासकीय कार्यालयेविविध संघटनाक्रीडा संघटनाक्रीडा मंडळक्रीडाप्रेमीखेळाडूयुवक-युवतीनागरीक यांनी सहभागी होऊनकार्यक्रम संपल्या नंतरचा सविस्तर अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा dsportsbld@gmail.com या मेलवर सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

निवृत्ती वेतन धारकांनी आपली माहिती कोषागार कार्यालयाला सादर करावी

  • 30 सप्टेंबर अंतिम मुदत
  • जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन  

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन धारक, कुटूंबनिवृत्ती वेतन धारकांची माहिती निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. तरी निवृत्ती वेतन धारकांनी आपली ‍ माहिती कोषागार कार्यालयाकडे शक्य तितक्या लवकर सादर करावी. या माहितीमध्ये पुर्ण नाव, पत्ता, पीपीओ क्रमांक, पॅन कार्ड, भ्र्मणध्वनी / दूरध्वनी क्रमांक, असल्यास ई मेल आयडी आणि आधार क्रमांक आदींचा समावेश असावा. ही माहिती to.buldhana@zillamahakosh.in या ई मेलवर पाठविण्यात यावी. सदर माहिती पाठविण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2020 आहे.

  केंद्र शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गणनेमध्ये बदल केले असून नवीन कर आकारणी प्रक्रिया आणि जुनी कर आकारणी प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानुसार निवृत्तीवेतन धारकांनी आपल्याला हवी असलेली कर आकारणी प्रक्रीया निवडून जिल्हा कोषागार कार्यालयाला to.buldhana@zillamahakosh.in या ई मेलवर आपले नाव, पीपीओ क्रमांक, बँक शाखेबाबत 15 ऑक्टोंबर पर्यंत कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.     

                                                                                    ***********      

शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सादर करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीची योजना महाडीबीटी पोर्टलमध्ये अंतर्भूत आहे.  शैक्षणिक सत्र सन 2019-20 वर्षाकरीता विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क व इतर योजनेचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता कार्यान्वीत होते. महाडीबीटी प्रणालीवर सन 2019-20 या शैक्षणीक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क  व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर एकूण 934 अर्ज प्रलंबीत असल्याचे डॅशबोर्डवरून दिसत आहे.

   महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालयास भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा शुल्क व इतर योजनेचे प्रथम हप्ता शिष्यवृत्तीकरीता अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयास मंजुरीकरीता सादर करण्यासाठी 10 सप्टेंबर 2020 ही अंतिम मुदतवाढ  शासनातर्फे देण्यात येत आहे. तरी महाविद्यालय प्राचार्यांनी अर्ज तात्काळ दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, इतर योजनांचे प्रथम हप्ता शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा या कार्यालयास महाडीबीटी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावेत. शासनाकडून दिलेल्या अंतिम मुदतीनंतर प्रलंबीत अर्ज ऑटो रीजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, याची गांभीर्याने महाविद्यालयाने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनीता राठोड यांनी केले आहे.

                                                ******        

नॅशनस डिफेन्स ॲकेडमी परीक्षेकरीता नागपूरसाठी एसटी सोडणार विशेष बसेस

  • विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : नॅशनल डिफेन्स ॲकेडमी व नेव्हल ॲकेडमी परीक्षा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो वीद्यार्थी जाणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने नागपूर येथे जाणे व येणेकरीता 4 व 5 सप्टेंबर रोजी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच 6 व 7 सप्टेंबर 2020 रोजीसुद्धा परती करीता बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे- येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. संपर्कासाठी आगारांचे क्रमांक पुढीलप्रमाणे बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173.                                       

                                            ******    

कोरोना अलर्ट : प्राप्त 231 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 63 पॉझिटिव्ह

  • 48 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 294 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 231 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 63 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 162 तर रॅपिड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 231 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 2, दाल फैल 1,सिंधी कॉलनी 4, कॉटन मार्केट रोड 1, सती फैल 1,  खामगांव तालुका : घाटपुरी 1, लोणी गुरव 1,  नांदुरा तालुका : नायगांव 4, चिखली शहर : 2,  चिखली तालुका : आंधई चांधई 1, मोहाडी 1, शेलगांव जहागीर 1,  जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 2,  शेगांव शहर : मटकरी गल्ली 1, रोकडीया नगर 1, चंदूबाई प्लॉट 1, जगदंबा नगर 1, राधाकृष्ण मॉल 1,  शेगांव तालुका : कालखेड 2,  बुलडाणा शहर : 5, जिल्हा रूग्णालय 2, शिवाजी नगर 1, बुलडाणा तालुका : धाड 1,  सागवन 7,  मलकापूर शहर : सराफा बाजार 2, उपजिल्हा रूग्णालय 1, यशोधाम 2, गौरक्षण प्लॉट 1, पारपेठ 2,  मलकापूर तालुका : अनुराबाद 1,सिं. राजा तालुका : दे. कोळ 1, साखरखेर्डा 1,  मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : उटी 1,  सिं. राजा शहर : 1,     संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 63  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 48 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, संग्रामपूर तालुका : वसाडी 1, शेगांव शहर : जानोरी रोड 1, लखपती गल्ली 1, नांदुरा तालुका : वसाडी बु 3, नायगांव 4,  नांदुरा शहर : सिंधी कॅम्प 1,मोताळा तालुका : गोतमारा 8, दे. राजा तालुका : अंभोरा 1, असोला 2, दिग्रस 13,  दे. राजा शहर : 5, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1.     

   तसेच आजपर्यंत 17776 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2171 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2171 आहे. 

  आज रोजी 1109 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 17776 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2171 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 915 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*

No comments:

Post a Comment