Thursday 20 August 2020

DIO BULDANA NEWS 20.8.2020

 कोविड समर्पित रूग्णालयात ‘लिक्वीड ऑक्सीजन टँक’ची उभारणी करावी

-    पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • गणेशोत्सव घरातच साजरा करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : स्त्री रूग्णालयामध्ये नुकतचे अद्ययावतीकरण झाले आहे. रूग्णालयात 100 खाटांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करणे व नियमित पुरवठा करणे जिकरीचे आहे. त्यामुळे कोविड समर्पित रूग्णालयाच्या आवारातच लिक्वीड ऑक्सीजन टँकची उभारणी करण्यात यावी. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संबंधीत यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात आज कोविड, गणेशोत्सवबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे आढावा घेताना बोलत होते.

  यावेळी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील- भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

 आरटीपीसीआर प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वीत करण्याचे आदेशीत करीत पालकमंत्री म्हणाले, प्रयोगशाळेकरीता यंत्र सामुग्री  आली नसल्यास त्वरित बोलावून घ्यावी. तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. आरोग्य विभागातील पदभरती करण्याची कार्यवाही करावी. आरोग्य विभागात एकही रिक्त पद राहता कामा नये. रिक्त पदांच्या पदभरतीसाठी जाहीरात काढून अर्ज मागवावे. दे. राजा ग्रामीण रूग्णालयातील पदभरतीबाबत तात्काळ कारवाई करावी.

  गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था, कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेत पालकमंत्री म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरातच साजरा करावा सार्वजनिक रित्या गणेशोत्सवाला परवानगी नाही. त्यामुळे कुणीही सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा करू नये.  कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी यापुढील सणांच्या काळात  गर्दी टाळावी. बाहेर पडताना मास्क किंवा तोंडावर स्वच्छ रूमाल, सामाजिक अंतराचे पालन व वारंवार हात धुवावे.  

  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रूग्णवाहिकांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर तात्काळ पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्ह्याला 20 रूग्णवाहिका मिळण्यासाठी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली.

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची तात्काळ माहिती घ्यावी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांना पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. त्यांनी क्रॉप इन्शुरन्स अप्लीकेशन या मोबाईल ॲपद्वारे नुकसान नोंदवावे. याकरीता गुगल प्ले स्टोअरवर जावून ॲप डाऊनलोड करावे. तसेच टोल फ्री क्रमांक 18001024088 यावर देखील पिकांचे नुकसानीची माहिती द्यावी. सदर टोल फ्री क्रमांक न लागल्यास व अॅप डाऊनलोड करणे शक्य न झाल्यास किंवा ॲपमध्ये माहिती भरली न गेल्यास कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसान नोंदण्याकरीता सुचना पत्राचा फॉर्म प्राप्त करावा. सदर फॉर्ममध्ये शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती 72 तासात कृषी सहायक यांनी भरून घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

*****

 

 

 

                   जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सामाजिक ऐक्य पंधरवाडाचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : बुलडाणा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. जातीय सलोखा व सामजस्य वृद्धींगत करणे, सामाजिक एकोपा व सौहार्दभाव कायम टिकविण्यासाठी या पंधरवडाचे आयोजन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. आजच्या सद्भावना दिनापासून सुरू झालेल्या या सामाजिक ऐक्य पंधरवाड्यानिमित्ताने आज सद्भावना दिन शपथही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील- भुजबळ यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सदर पंधरवडा संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यादरम्यान येणाऱ्या गणेशोत्सवाला आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात रक्तदान महायज्ञ, जनजागृती प्रबोधन व मिशन पॉसिबल उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कळविले आहे.

                                                                        *****

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिनाची शपथ

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ 20 ऑगस्ट हा दिवस  सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवासाची शपथ आज अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांना दिली. यावेळी सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे, नायब तहसिलदार श्री. इंगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. पवार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                ******

  

कोरोना अलर्ट : प्राप्त 163 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 42 पॉझिटिव्ह

  • 77 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 205 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 163 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  प्रयोगशाळेतील 35 व रॅपिड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 65 तर रॅपिड टेस्टमधील 98 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 163 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव : किसन नगर 2,  वाडी 2, सुटाळा 2, गांधी चौक 1, जगदंबा रोड 1, गौरक्षण रोड 1, अनिकेत रोड 1, शंकर नगर 2, देशमुख प्लॉट 2, भालेगांव बाजार ता. खामगांव : 7,  पिं.राजा ता. खामगांव : 3, माक्ता कोक्ता ता. खामगांव : 1,  शेगांव : पंचशील नगर 3, सदगुरू नगर 4, आळसणा ता. शेगांव : 1, हिवरखेड ता. सिं. राजा : 2, निमखेड ता. जळगांव जामोद : 1, बुलडाणा : 3, विजय नगर 1, किन्ही सवडत ता. चिखली : 1, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 42  रूग्ण आढळले आहे.        

तसेच आज 77 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  जळगांव जामोद : रामनगर वाडी 1, चौबारा 1, राणी पार्क 2,  नांदुरा : विदर्भ चौक 1, विठ्ठल मंदीराजवळ 1, नांदुरा खुर्द 1, चिखली : 2,  शिक्षक कॉलनी 2, बगीचाजवळ 1, दुध डेअरीजवळ 1, आनंद नगर 1, डिपी रोड 2, बुलडाणा अर्बन बँकजवळ 1, नगर परिषद कार्यालयाजवळ 5,  दे. राजा : 4, सिव्हील कॉलनी 2, अहिंसा मार्ग 3, संजय नगर 5,  मलकापूर : 1, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, पिं. राजा ता. खामगांव : 1, खामगांव : 4,  प्रशांत नगर 1, बाळापूर फैल 2, शेगांव रोड 1, शंकर नगर 1, बालाजी प्लॉट 1, पोलीस वसाहत 1, बालाजी फैल 6, फरशी रोड 1, सिवील लाईन 2, यशोधरा नगर 1, सुटाळा खुर्द 3, वाडी 3, तिरूपती नगर 1, देशमुख फैल 1, महबूब नगर 1,   शेगांव : देशमुखपुरा 1, झमझम कॉलनी 1, मूळ पत्ता शिपोरा ता. भोकरदन जि. जालना 1, नांदुरा : 1, पोलीस वसाहतीमागे 1, कृष्णा नगर 1,  बुलडाणा : नक्षत्र अपार्टमेंट 2.  

   तसेच आजपर्यंत 14733 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1571 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1571  आहे.  आज रोजी 295 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14733 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2437 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1571 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 825 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment