Wednesday 19 August 2020

DIO BULDANA NEWS 19.8.2020

 शेतकऱ्यांनी शेताच्या नुकसानाची माहिती कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावी

  • पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : माहे 10 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्ट  2020 या कालावधीत  जिल्ह्यात विविध ठिकाणी जादा पाऊस झालेला आहे. या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचून पिकांचे नकसान झाले आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरडून देखील गेली आहे. याच बरोबरीने धरणातील पाण्याचा साठा पुर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडले गेले. त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्येसुद्धा पाणी जावून पिकांचे नुकसान किंवा जमीन खरडून गेली असणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाच्या किंवा जमीन खरडून गेल्याचा नुकसानीची माहिती आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे द्यावी, असे आवाहन पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

  ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी क्रॉप इन्शुरन्स अप्लीकेशन या मोबाईल ॲपद्वारे आपले नुकसान नोंदवावे. याकरिता ‘गुगल प्ले स्टेअर’ वर जावून वरील ॲप डाऊनलोड करावे. सदर ॲप डाऊनलोड करणे शक्य न झाल्यास कृषी सहाय्यक यांचेकडे नुकसान झाल्यापासून 72 तासात देण्यात यावा, असे आवाहनही पालकमंत्री  ना. राजेंद्रजी शिंगणे यांनी केले आहे.

*****

 

डिएलएड प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू

  • संकेतस्थळ www.maa.ac.in वर प्रवेश अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी डीएलएड या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणेबाबत सविस्तर सूचना प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे www.maa.ac.in या संकेतस्थाळावर उपलब्ध आहे.

    प्रवेश प्रक्रिया दि. 17 ऑगस्ट 2020 पासून वरील संकेतस्थळावर सुरू झाली असून  अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडे स्वत:चा ई- मेल आयडी असणे बंधकारक आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग 200 रुपये, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी 100 रुपये असणार आहे. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमांसाठी अर्ज करावयाचा असेल,  तर प्रत्येक माध्यमास संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल. प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन/ पेयमेंट गेटवे/ ई व्हॅलेट किंवा क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड याद्वारे स्वीकारण्यात येणार आहे.

     प्रवेशास इच्छूक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हिसी शाखेतील पात्र उमेदवार 12 वी खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणासह उतीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी असल्यास support@deledadmission.in या ईमेल वर पाठवाव्यात. तसेच 8421003146 क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवेशबाबतचे वेळापत्रक वरील संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाणार आहे.  तरी उमेदवारांनी वरील संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे प्रचार्य विजयकुमार शिंदे यांनी केले आहे.

                                                            ******

 

 

तुर व हरभरा खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रूपये मिळणार

  • सन 2017-18 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नोंदणी करणारे शेतकरी

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : हंगाम 2017-18 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत तुर व हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी काही शेतकऱ्यांचा तूर व हरभरा शेतमाल खरेदी खरेदी झाला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याकरिता राज्य शासनाने सदर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 1000 रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. काही पात्र शेतकऱ्यांना शासन निर्णयाच्या अधिन राहून आधारबेस अनुदानाचे वितरणसुद्धा करण्यात आले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची आधार संलग्न बँक खाते तपशील, आधार कार्ड प्राप्त नसणे आदी अपूर्ण माहिती आहे. अशा शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करता आले नाही.

    तरी अशा शेतकऱ्यांनी ज्या खरेदी विक्री संघाकडे तूर व हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आलेला नाही. त्यांनी संस्था अथवा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडे तात्काळ वरील कागदपत्रे सादर करावीत. संस्थाकडे सादर करण्यात आलेल्या अर्जांची तपासणी करून संबंधीत संस्था जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे यादी सादर करतील. त्यानंतर तात्काळ अशा शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येईल, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        *******

वृद्ध कलावंतांनी मानधनासाठी अर्ज सादर करावे

  • 20 सप्टेंबर 2020 अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांनी सन 2020-21 करीता आपले अर्ज संबंधीत तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सादर करावे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियम व अटींची संपूर्ण माहिती संबंधीत पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत आहे. इच्छूक लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज 20 सप्टेंबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधीत पंचायत समिती कडे सादर करावीत.

    यापूर्वी या योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने ते अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जातील नमूद अटींची पुर्तता करणाऱ्या व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छाननीअंती पुरावा कागदपत्रांसह सादर केलेले वैध व योग्य अर्जच स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे या संबंधी नियम व अटी, शर्ती अर्जदारांनी काळजीपुर्वक वाचुनच अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपुर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. तरी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले आहे.

                                                *******   

कोरोना अलर्ट : प्राप्त 199 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 39 पॉझिटिव्ह

  • 45 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 238 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 199 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  प्रयोगशाळेतील 33 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 117 तर रॅपिड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 199 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2, परदेशीपुरा 1, नगर परीषदेच्या मागे 1, जुनागांव 1, विष्णूवाडी 1,  शेगांव : मिलींद नगर 1, धनोकार नगर 3, माळीपुरा 1, जलंब ता. शेगांव : 1, चिखली : 1, मेहकर : 1, नांदुरा : 1, अमडापूर ता. चिखली : 1, सोनेवाडी ता. चिखली : 1, सुलतानपूर ता. लोणार : 2, अंजनी खु ता. मेहकर : 1, दे.राजा : 1, सिवील कॉलनी 1, लोणार : 1, मेरा बु. ता. चिखली : 1, निमखेड ता. जळगांव जामोद : 2, खामगांव : सती फैल 1, वाडी 9, सुदर्शन नगर 1, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, तेल्हारा ता. खामगांव : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 39  रूग्ण आढळले आहे.  तसेच आज परदेशीपुरा बुलडाणा येथील 77 वर्षीय पुरूष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 1, जाफ्राबाद रोड 3, दत्तापूर ता. बुलडाणा : 1, मलकापूर : 1, भोगावती ता. चिखली : 2, दाताळा ता. मलकापूर : 3, शेगांव : ओमनगर 3, लखपती गल्ली 2, तीन पुतळ्याजवळ 1,  मेहकर : 3, विठ्ठल नगर 2, स्टेट बँक जवळ 1, मँगो हॉस्टेल मागे 1, संताजी नगर 1, डोणगांव रोड 3,  वडशिंगी ता. जळगांव 1,   आडोळ बु. ता. जळगांव जामोद : 4, खळेगांव ता. लोणार : 2, सुलतानपूर ता. लोणार : 4, दे.राजा : खडकपूरा 2, खामगांव : शिवाजी वेस 2, मेरा बु. ता. चिखली : 1, निमखेड ता. जळगांव जामोद 1.

   तसेच आजपर्यंत 14570 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1494 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1494  आहे.  आज रोजी 138 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14570 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2395 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1494 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 860 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


--

No comments:

Post a Comment