Friday 28 August 2020

DIO BULDANA NEWS 28.8.2020

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • खेळविषयक वेबीनारचे आयोजनही होणार
  • 2 ऑक्टोंबर पर्यंत ‘फिट इंडिया फ्रीडम रन' उपक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याचे दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगर) यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  त्याप्रमाणे जिल्‍ह्यात विविध क्रीडा दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    क्रीडा दिनाचे औचित्य साधुन ऑनलाईन विविध खेळ विषयक चर्चासत्र , वेबीनारही आयोजीत करण्यात येणार आहे.  तसेच कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  त्यामुळे आरोग्य विभागाशी संपर्क साधुन सामाजिक अंतर राखुन रक्तदान शिबीरांचे आयोजन करणे, फिटनेसबाबत आरोग्य तपासणी करणे, लोकांमध्ये रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी (इम्युनिटी) जागृकता निर्माण करणे, शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण पाहणेकरीता, Oxymeter ने तपासणी करणे व इत्यादींची माहिती पटवुन देणे.  केंद्र शासन / राज्य शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक सामाजिक अंतर राखुन सर्व खबरदारी व मार्गदर्शक सुचना पाळत कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात येणार आहे.

      केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेऊन, फिट इंडिया फ्रीडम रन हा नविन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.  नियमित व्यायामाकरीता प्रोत्साहीत करण्यासाठी सर्वांना लठ्ठपणा, आळस, चिंता, आजार इत्यादी पासुन मुक्त होण्यासाठी व मदत करण्यासाठी  फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन ही चळवळ दि.29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे.  तुम्ही कोठेही, कधीही धावु / चालु शकता किंवा सायकलींग करु शकता या उपक्रमामागील संकल्पना आहे. 

   स्वयंचलीतपणे किंवा कोणत्याही ट्रॅकींग ॲप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या / चाललेल्या / सायकलींग अंतराचा मागोवा घेता येणार आहे किंवा ॲप वापर शक्य नसल्यास क्रीया पुर्ण झाल्यानंतरचा फोटो यापैकी एक अपलोड करता येईल. सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरुन सादर करावयाचा आहे. 

     सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर www.fitindia.gov.in    https:/ /docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfGpaDej3yOnzQk_0BlRbNSz48N3VtyJAbGOIxBwSV1T1R7Pg/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0  या ब्लॉगवर फॉर्म भरुन नोंदणी केल्याची नोंदीचा स्क्रीनशॉट  dsportsbld@gmail.com या ई-मेल आयडीवर व 9970071172 या व्हाटस्अप मोबाईल नंबर वर अहवाल सादर करावा. तसेच पुर्ण माहिती भरल्यानंतर आपणास ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. अडचणींसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांचेशी मोबाईल क्रमांक 9970071172 संपर्क साधावा. ज्यांना क्रीडा दिन रोजी या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही अशा सर्वांना दि.29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत  आपल्या सोईच्या वेळेनुसार सहभागी होता येणार आहे.

  तरी वरीलप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा दिन व फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, विविध संघटना, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, क्रीडाप्रेमी, खेळाडू, युवक-युवती, नागरीक यांनी सहभागी होऊन, कार्यक्रम संपल्यानंतरचा सविस्तर अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा  dsportsbld@gmail.com या मेलवर सादर करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

                                                            ******

 

गणपती विसर्जन घरीच करावे; गर्दीत जाणे टाळा

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जागतिक कोविड 19 या साथरोगाचे प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 पर्यंत गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने, घरच्या घरी साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांना परवानगी देण्यात येवू नये, असा निर्णय जिल्हा शांतता समितीच्या 20 जुलै रोजी आयोजित बैठकीत घेण्यात आला. तसेच श्रींच्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येवू नये असे निर्देशही देण्यात आले. तरी नागरीकांनी 1 सप्टेंबर रोजी होणारे श्रींचे विसर्जन घरच्या घरी करावे. कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 श्रीगणेश मूर्ती शाळू मातीची किंवा पर्यावरण पूरक असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा पुढील वर्षी भाद्रपद महिन्यात विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनावेळी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटूंबीयांचे कोरोना साथरोगापासून रक्षण करता येईल. श्रींच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी सुरक्षीततेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये. संपूर्ण उत्सवादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल लावणे व वारंवार स्वच्छ हात धुणे या नियमांचे पालन करावे. तसेच विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी कमीत कमी नागरिकांनी थांबण्याचे निर्देश असून ते पाळावे, असे आवाहनही अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        *******

कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता अकोला येथून शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, दु. 3.30 वाजता बुलडाणा येथे आगमन, दु. 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कृषि विषयक संबंधीत विषयांची जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती, बुलडाणा येथे क्षेत्रीय भेटी सायं 6 वा बुलडाणा येथून जळगांव मार्गे मालेगांव जि. नाशिककडे प्रयाण करतील.


No comments:

Post a Comment