Friday 14 August 2020

DIO BULDANA NEWS 14.8.2020

 आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..!

  • ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा
  • राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतात
  • दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेदरम्यान मिळणार सल्ला

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलिकन्सल्टेशन सर्विसद्वारे रूग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचाराबद्दलची माहिती रूग्णालयात न जाता घरच्या घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

  सी – डॅक या संस्थेकडून https://esanjeevaniopd.in हे पोर्टल व esanjeevaniopd हे मोबाईल वरील ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर किंवा ॲपचा उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडीओ – व्हिडीओद्वारे सल्लामसलत करून रूग्ण त्यांच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेवू शकतात. रूग्णाच्या वेगवेगळ्या आजारांवर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ई प्रेस्क्रिप्शन दिल्या जाते.

   सध्याच्या कोरोना साथरोगामध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रूग्णाला रूग्णालयात न जाता घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेता येणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत ई संजीवनी ओपीडी सेवेसाठी उपरोक्त पोर्टल व ॲपवर ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.

 तरी शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी केले आहे.

                                                            ई. संजीवनी ओपीडीची ठळक वैशिष्ट्ये

रूग्णाची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ – व्हिडीओ सल्लामसलत, ई प्रेस्क्रिप्शन, एसएमएस / ई मेल द्वारे सूचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामूल्य सेवा.

                                                                        *********

          शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 15 ऑगस्ट रोजी दु. 1.30 वाजता वाशिम येथून मोटारीने मेहकरकडे प्रयाण, दु. 2.30 वा मेहकर नगर परिषदेच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, सायं 4 वाजता शासकीय विश्राम गृह चिखली येथे आगमन व राखीव, सायं 4.15 वाजता पंचायत समिती कार्यालय येथे जिल्हा शिक्षण विभागाची आढावा बैठकीस उपस्थिती, सायं 5.30 वा शासकीय विश्रामगृह चिखली येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे प्रयाण करतील.

                                                                                                                ********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 295 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 59 पॉझिटिव्ह

  • 19 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 354 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 295 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 59 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  प्रयोगशाळेतील 31 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 95 तर रॅपिड टेस्टमधील 200 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 295 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोहोज (भडगांव) ता. बुलडाणा : 1, बुलडाणा शहर : लहाने ले आऊट 4, आरास ले आऊट 1, लांडे ले आऊट 2, चैतन्यवाडी 1, वावरे ले आऊट 1, शिवाजी नगर 3,   मेहकर : 3, डोणगांव रोड 2,  जानेफळ ता. मेहकर : 5,  चिखली : 1, मलकापूर : 1, हतेडी ता. बुलडाणा : 2, दे. राजा : 1, जुना जालना रोड 1, बालाजी नगर 3,  खामगांव : वाडी 1, मखारीया मैदान 4, घाटपुरी नाका 2, जलालपूरा 2, शिवाजी वेस 3,  भालेगांव बाजार ता. खामगांव : 2, शेगांव : मोदी नगर 1, ओम नगर 1, देशमुखपुरा 1, लोणार : 1, पिं.काळे ता. जळगांव जामोद : 8 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 59  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  माटरगांव ता. शेगांव : 8, बावनबीर ता. संग्रामपूर : 3, मलकापूर : 2, आनंद सोसायटी 1,  रोहणा ता. खामगांव : 1, खामगांव : शिवाजी वेस 1, सती फैल 1, तलाव रोड 2.

   तसेच आजपर्यंत 13520 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1253 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1253 आहे. 

  आज रोजी 179 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13520 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2126 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1253 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 835 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 38 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                    ******

                      

No comments:

Post a Comment